शाओमीकडून सात पॉप-अप कॅमेऱयांचा लवकरच स्मार्टफोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शाओमी कंपनी लवकरच सर्वाधिक कॅमेऱयांची सुविधा असणारा स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत आपण डब्बल, ट्रिपल, क्वॉड आदी कॅमेऱयांचे स्मार्टफोन सादर झाल्याचे पाहिले आहे. परंतु सध्या शाओमी पॉप-अप कॅमेऱयांची सुविधा देण्यावर कंपनी भर देत आहे. वनप्लस-7 प्रो, ओप्पो रेनो, असुस जेनफोन-6, शाओमी मिक्स-3 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए80 यासारख्या स्मार्टफोनमध्ये या कॅमेऱयांची सुविधा देण्यात आली आहे. परंतु यांच्यापेक्षा सरस ठरत शाओमी कंपनी 7 पॉप-अप कॅमेऱयाचा स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
चिनी स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी शाओमीने लवकरच 7 पॉप-अप कॅमेऱयाची सोय असणाऱया स्मार्टफोनचे डिझाईनचे पेटेंट केले आहे. अशी माहिती बिजनेस इनसाइडरच्या अहवालातून सांगितले आहे. तर यावेळी उत्पादनासंदर्भात कंपनीकडून कोणताही खुलास करण्यात आलेला नाही.