For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरी सरकारी बँकांना 5 वर्षात 220 कोटींचा गंडा

08:32 PM Jan 27, 2020 IST | Tarun Bharat Portal
शहरी सरकारी बँकांना 5 वर्षात 220 कोटींचा गंडा
Advertisement

फसवणुकीची 1 हजार प्रकरणे : आरबीआयची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शहरी सहकारी बँकांना (यूसीबी) गेल्या पाच आर्थिक वर्षात फसवणुकीतून 220 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यादरम्यान, बँकांमध्ये फसवणुकीची सुमारे 1 हजार प्रकरणे समोर आली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) देण्यात आली आहे. माहिती अधिकाराखाली (आरटीआय) मागवण्यात आलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 च्या दरम्यान 127.7 कोटी रुपयांच्या फसवणुकीतून एकूण 181 प्रकरणी समोर आली आहेत. याच प्रकारे, बँकांची 2017-18 मध्ये 99 प्रकरणे (46.9 कोटी रुपये) आणि 2016-17 मध्ये 27 प्रकरणे (9.3 कोटी रुपये) फसवणुकीची असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

आरबीआयने म्हटले आहे की, 2015-16 मध्ये 17.3 कोटी रुपयांची 187 फसवणूक प्रकरणे, 2014-15 मध्ये 19.8 कोटींची 478 फसवणूक प्रकरणे आहेत. 2014-15 आणि 2018-19 च्या दरम्यान शहरी सहकारी बँकांमध्ये 221 कोटी रुपयांची एकूण 972 फसवणूक प्रकरणे नोंद झाली आहेत, अशी माहिती आरबीआयने आरटीआयद्वारे दिली आहे.

प्रकरणावरील कारवाईचा तपशिल देण्यास नकार

देशभरातील एकूण 1544 शहरी सहकारी बँकांमध्ये 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 4.84 लाख कोटी रुपये जमा होते, यातील सर्वाधिक तीन लाख कोटी रुपये महाराष्ट्रातील 496 बँकांमध्ये तर गुजरातमधील 219 बँकांमध्ये 55102 कोटी रुपये आणि कर्नाटकमधील 263 बँकांमध्ये 41096 कोटी रुपये जमा होते अशी माहिती आरबीआयने दिली आहे. मात्र, फसवणुकीच्या प्रकरणावरील कारवाईचा तपशिल देण्यास नकार देत ही आकडेवारी सहज उपलब्ध होणार नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.