व्होडाफोनचा एम-पैसा बंद : प्रमाणपत्र रद्द
वृत्तसंस्था/ मुंबई
व्होडाफोन कंपनीने आपली पेमेन्ट बँकेची शाखा ‘एम-पैसा’ यांचे कामकाज बंद केले आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) यांच्याकडून व्होडाफोन एम-पैसा याला वितरीत करण्यात अलेले प्रमाणपत्र (सीओए) रद्द करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वेइच्छा प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर ते रद्द करण्यात आले आहे. आरबीआयने मंगळवारी सीओए रद्द करण्यात आल्यामुळे कंपनी प्रीपेड पेमेन्टशी संबंधीत असणारे कार्य करु शकणार नसल्याची माहिती आरबीआयने सांगितले आहे.
ग्राहक आणि व्यापाऱयांचा पेमेन्टशी संबंधीत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास कंपनीवर कायदेशिरीत्या दावा दाखल करण्याची सोय कंपनीचा सीओए रद्द झाला असला तरी तीन वर्षांपर्यंत दाखल करता येणार आहे. (30 डिसेंबर 2022) आरबीआयने व्होडाफोन एम-पैसा स्वेच्छा अधिकार पत्र परत केले आहे. मागील वर्षात व्होडाफोन आयडिया यांनी अदित्य बिर्ला आयडिया पेमेन्ट बँक लिमिटेड (एबीआयपीबीएल) बंद झाल्यानंतर एम-पैसा ही शाखा बंद केली होती.
एम-पैसाचा विस्तार
व्होडाफोन एम-पैसा यांचा समावेश असणाऱया 11 कंपन्यांमध्ये समावेश आहे. ज्यामध्ये आरबीआयने 2015 मध्ये पेमेन्ट बँकेला परवाना दिला होता.