‘व्हर्च्युअल’मुळे संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये उपस्थिती वाढली
2020-21 मधील स्थिती : अहवालामधून माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशामधील नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या व्हर्च्युअल बैठकांमधील सदस्यांची उपस्थिती ही मागच्या तुलनेत लक्षणीयरित्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. ऑफलाईन स्वरुपाच्या बैठकीत तेव्हा म्हणावी तशी उपस्थिती संचालकांची दिसून येत नव्हती.
मात्र आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीदरम्यान मात्र या स्थितीत अमूलाग्र बदल होत गेल्याचे दिसून येत व्हर्च्युअल बैठकांमधील संचालकांची उपस्थिती ही वेगाने वाढत गेल्याची माहिती एक्सिलन्स एनेबलर्सच्या सर्वेक्षणामधून देण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 86 टक्के संचालकांची उपस्थिती असे, मात्र आता हीच संख्या 100 टक्क्यांवर राहिली आहे. कोरोना महामारीच्या प्रभावाने व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱया बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचेही यावेळी नोंदवण्यात आले आहे. या अगोदर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत एकूण सदस्य संख्या 63 टक्के होते. याचदरम्यान 14 टक्के संचालकांची उपस्थिती शून्यावर राहिल्याचीही माहिती आहे. कंपनीने आपल्या सर्वेक्षणामध्ये ‘कॉर्पोरेट आणि अन्य व्यवसायां’चा या अहवालात समावेश केला आहे.