महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमान इंधनाच्या किमती उच्चांकी स्तरावर

06:34 AM Mar 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

 विमान इंधन म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या (एटीएफ) किमती बुधवारी  तब्बल 18 टक्क्यांनी वाढल्याची नेंद करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील एटीएफचे भाव विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याच्या दरम्यान एटीएफचे भाव वाढत गेल्याचे दिसून आले.

Advertisement

जेट इंधनाच्या किमती चालू वर्षात सहाव्यांदा वधारल्या आहेत. एटीएफच्या किमती प्रथमच एक लाख रुपये प्रति किलोलिटर पार गेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या मूल्य अधिसूचनेनुसार राष्ट्रीय राजधानीमध्ये एटीएफचे भाव 18.3 टक्क्यांच्या वृद्धीसोबत 1,10,666.29 रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. तेलाच्या किमती मागील आठवडय़ात 14 वर्षांचा सर्वाधिक स्तर प्राप्त करत 140 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article