विप्रोचा नफा डिसेंबर तिमाहीत 2.17 टक्क्यांनी घटला
घटीसह 2456 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 2,455.9 कोटी रुपयाचा नफा झाला आहे. हाच आकडा 2018 मधील डिसेंबर तिमाहीतील नफ्यासोबत तुलना केल्यास (2,510.4 कोटी रुपये) म्हणजे 2.17 टक्क्यांनी कमी झाला आहे. महसूल कमाईत मात्र 2.7 टक्क्यांनी वाढून 15,470.5 कोटी रुपयावर झेप घेतली आहे. हाच आकडा 2018 मधील डिसेंबर तिमाहीत 15,059.5 कोटीवर राहिला आहे.
कंपनीने प्रति समभाग 1 रुपयाच्या अंतरिम डिव्हीडेंड घोषित केला आहे. डिव्हिडेंडचे पेमेन्ट करण्यासाठी नोंदणी तारीख 27 जानेवारी निश्चित केली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्याच्याकडे समभाग असणार आहेत. त्यांना डिव्हीडेंड मिळणार आहेत.
मार्च तिमाहीत नफ्याची अपेक्षा
आयटी सर्व्हिसेस महसूलात 2.2 टक्क्यांनी वाढून 209.48 कोटी डॉलरवर राहिला आहे. कंपनीला अपेक्षा आहे की मार्च तिमाहीपर्यंत आयटी सर्व्हिसेसमध्ये महसूलात 2 टक्क्यांनी वाढून 209.5 कोटी डॉलर ते 213.7 कोटी डॉलरच्या दरम्यान राहण्याचे संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत.
मोठय़ा व्यवहारांवर फोकस
विप्रोचे सीईओ आणि एमडी अबिदअली जेड नीमचवाला यांच्या माहितीनुसार डिसेंबर तिमाहीत सर्व व्यवसाय यूनिटमध्ये वाढीची नोंद राहिली आहे. तर आम्ही ग्राहकांना मजबूत करण्यासाठी आणि मोठय़ा व्यवहारांवर फोकस करण्याची तयारी असल्याचे कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे.