महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदितचा नाकामुराला पुन्हा धक्का

06:15 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने मागील सामन्यातील पराभवानंतर सर्व कौशल्य पणाला लावत येथे चालू असलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत अमेरिकेच्या द्वितीय मानांकित हिकारू नाकामुराला पराभूत करून एका धक्क्याची नोंद केली. दुसरीकडे, डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांच्यातील लढत बरोबरीत संपली.

Advertisement

दिवसाला इतर कोणतेही सामने निर्णायक निकाल देताना दिसले नाहीत. रशियाच्या इयान नेपोम्नियाचीचा फ्रेंच खेळाडू फिरोझा अलीरेझाविऊद्धचा सामना बरोबरीत सुटला, तर अझरबैजानच्या निजात आबासोव्हने अमेरिकी खेळाडू फॅबियानो काऊआनाला बरोबरीत रोखून दाखविले. वर्षातील या सर्वांत मोठ्या स्पर्धेत पाच फेऱ्या बाकी असताना नेपोम्नियाची आणि गुकेश हे 5.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, तर प्रज्ञानंद त्यांच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

नाकामुरा, गुजराथी आणि काऊआना हे 4.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत, तर अलीरेझाचे 3.5 गुण आणि आबासोव्ह तीन गुण  झाले आहेत. कँडिडेट्स स्पर्धेच्या सुऊवातीच्या दिवशी चार सामने बरोबरीत सुटले होते आणि त्यानंतर गुजराथीने नाकामुरावर शानदार विजय मिळवला होता. स्पर्धेचा दुसरा टप्पाही त्याचीच आठवण करून देणारा राहिला. कारण गुजराथीने पुन्हा एकदा अमेरिकन बुद्धिबळपटूवर मात केली. मागील फेरीत गुकेशकडून पराभूत होऊनही गुजराथीने इटालियन ओपनिंग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा त्याला मिळाला.

महिला विभागात आर. वैशालीची राहिलेली आशा चीनच्या झोंगयी टॅनच्या हातून झालेल्या आणखी एका पराभवाने संपुष्टात आणली. चिनी खेळाडू सहा गुणांसह आघाडीवर आहे. या विभागात हा एकमेव सामना निर्णायक निकाल देणारा राहिला. भारताच्या कोनेरू हम्पीने रशियाच्या कॅटेरिना लागनोसोबत बरोबरी साधून आपली स्थिती थोडी सुधारली, तर टिंगजी लेईला बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हाने बरोबरीत रोखले. दिवसाच्या अन्य सामन्यात युक्रेनच्या अॅना मुझिचूकने रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबत बरोबरी साधली. 5.5 गुणांसह लेई व गोर्याचकिना दुसऱ्या स्थानावर असून लागनो अर्ध्या गुणाने मागे आहे. सलीमोव्हा आणि हम्पी प्रत्येकी चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. मुझिचूकचे 3.5 गुण, तर वैशालीचे फक्त 2.5 गुण झाले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#SportNews
Next Article