महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वहाब रियाझ, अब्दुल रझाक यांना निवड समितीतून डच्चू

06:44 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने माजी कसोटीपटू वहाब रियाझ व अब्दुल रझाक यांची निवड समितीतून हकालपट्टी केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी झाल्याने त्यांना प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते, त्या पार्श्वभूमीवर पीसीबीने ही कारवाई केली आहे.

Advertisement

पाकने चेअरमन नसलेली निवड समिती नेमली होती. त्यात वहाब रियाझ, रझाक व कर्णधारांसह प्रमुख प्रशिक्षक, डाटा अॅनालिस्ट यांचा समावेश होता. गेल्या नोव्हेंबरपासून रियाझ निवड समिती सदस्य असून संघासोबत ते वरिष्ठ संघव्यवस्थापक या नात्याने स्पर्धेला गेले होते. रियाझ व रझाक यांच्या हकालपट्टीचे कारण मात्र पीसीबीने स्पष्ट केले नाही. निवड समितीचे पुढील अपडेट लवकरच जाहीर केले जाते, असे पीसीबीने म्हटले आहे. त्यांच्या हकालपट्टीनंतर मुहम्मद युसूफ व आसद शफीक हे दोन निवड समिती सदस्य बाकी राहिले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article