लॉकडाऊनमुळे दूरसंचार कंपन्यांची कमाई वाढण्याची शक्मयता
नवी दिल्ली :
कोरोना विषाणूमुळे महारामारीचा प्रसंग देशासोबत संपूर्ण
जगभरात निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे जास्तीत जास्त कंपन्यांनी आपल्या
कर्मचाऱयांना घरातुनच काम करण्याचा पर्याय(वर्क फ्रॉम होम) निवडण्यास सांगितले आहे.
यामुळे इंटरनेटचा वापर वाढल्याने डाटा विक्रीत मोठी तेजी आली आहे. आणि याच गोष्टीचा
फायदा दूरसंचार कंपन्यांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दूरसंचाल ऑपर्रेटर्स
असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत
दूरसंचार कंपन्यांचे उत्पन्न 15 टक्क्मयांनी वधारण्याचे संकेतही दिले आहेत. तसेच याच
तिमाहीतील एआरपीयू 140 ते 145 रुपयावर राहण्याचा अंदाज आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, रिलायन्स जिओसह
अन्य सदस्यांना मिळणाऱया फिडबॅकच्या आधारावर सीओएआय यांनी अनुमान नोंदवले आहे. लॉकडाऊनच्या
पार्श्वभुमीवर देशातील बहुतांश कंपन्यांमधील कर्मचारी घरातून काम करण्यास सुरुवात केली
आहे. यामुळे मार्च महिन्यात 5 लाख नवीन इंटरनेट ग्राहकांची जोडणी झाल्याची माहिती सीओएआयचे
संचालक राजन एस मॅथ्यूज यांनी सांगितले आहे. तर डाटा वापरण्यात 15 ते 30 टक्क्मयांपर्यंतची
वाढ नोंदवण्यात आली आहे. या सर्वाचे अनुमान एकत्रित करत चालू आर्थिक वर्षात दूरसंचार
कंपन्यांच्या कमाईत 10 ते 12 टक्क्मयांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.