महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाहोरमध्ये होणार भारत-पाक मुकाबला

06:37 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मसुदा तयार :

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर, इस्लामाबाद

Advertisement

टी 20 विश्वचषकानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. 1 मार्च 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबतचा निर्णय होणार आहे. दरम्यान, पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाचा मसुदा तयार केला असून बुधवारी तो आयसीसीला सादर करण्यात आला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे. 10 मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच अंतिम फेरीसाठी आणखी एक दिवस ठेवण्यात आला आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी 15 सामन्यांचे वेळापत्रक आयसीसी समोर सादर केले आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लाहोरमध्ये सात सामने खेळवले जाणार असून तीन सामने कराचीत होणार आहेत. यासोबतच रावळपिंडीत पाच सामने खेळवले जाणार आहेत.

भारत-पाक एकाच गटात

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांना अ गटात ठेवण्यात आलं आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ असतील. चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना कराची येथे आयोजित केला जाऊ शकतो. उपांत्य फेरीचे सामन्याचे यजमानपद रावळपिंडी आणि कराचीला मिळेल. फायनलचा थरार लाहोरच्या मैदानात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Next Article