महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लालू-शरद यादव पुन्हा एकत्र येणार

07:00 AM Mar 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘एलजेडी’ 20 मार्चला ‘आरजेडी’मध्ये विलीन होणार

Advertisement

पटना / वृत्तसंस्था

Advertisement

शरद यादव 20 मार्च रोजी लोकतांत्रिक जनता दलाचे (एलजेडी) राष्ट्रीय जनता दलामध्ये (आरजेडी) विलीनीकरण करणार आहेत. विखुरलेल्या जनता परिवाराला पुन्हा एकत्र करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये लालू आणि शरद यादव यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर यासंबंधी तर्कवितर्क बांधले जात होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी इन्कार केला होता. आता जुलै 2022 मध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होतील. शरद यादव यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्येच संपत आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यसभेतील पाच जागांपैकी दोन जागा भाजपच्या आणि एक जागा जेडीयूच्या वाटय़ाला जाईल. दोन जागा आरजेडीला मिळणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article