For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लव टुडेच्या हिंदी रिमेकमध्ये खुशी

06:02 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
लव टुडेच्या हिंदी रिमेकमध्ये खुशी
Advertisement

आमिर खानच्या पुत्रासोबत झळकणार

Advertisement

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूरने जोया अख्तरचा चित्रपट ‘द आर्चीज’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. खुशीला आता दोन नवे चित्रपट मिळाला असून यात ती सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम आणि आमिर खानचा पुत्र जुनैदसोबत दिसून येणार आहे. खुशीकडे सध्या दोन चित्रपट आहेत. एका चित्रपटात तिची जोडी इब्राहिमसोबत असेल तर दुसऱ्या चित्रपटात ती जुनैद खानसोबत झळकणार आहे.

धर्मा प्रॉडक्शन्सचा चित्रपट ‘नादानियां’मध्ये खुशी ही इब्राहिमची नायिका म्हणून दिसून येईल. तर दुसरीकडे खुशी ‘लव टुडे’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. यात जुनैद खान नायकाच्या भूमिकेत असेल. जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Advertisement

एकीकडे तो ‘महाराजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. तर दुसरीकडे ‘प्रीतम प्यारे’ चित्रपटाची निर्मितीही करत आहे. लव टुडेच्या हिंदी रिमेकमध्ये खुशी आणि जुनैद यांची नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. खुशीकरता हा चित्रपट बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.