लवकरच राष्ट्रीय व्यवसाय नोंद योजना येणार
प्रत्येक जिल्हावार व्यवसायांच्या माहितीचे होणार संकलन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सध्या एनआरसी आणि एनपीआरचे वारे वाहत आहे. त्यामुळे याला विविध ठिकाणी विरोध तर काही ठिकाणाहून प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु लवकरच सरकार आणखीन एक नोंदणी योजनेची निर्मिती करणार असून यात राष्ट्रीय व्यवसाय नोंदणी योजनेची (नॅशनल बिजनेस रजिस्टर) लवकरच निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. या नोंदणी योजनेत प्रत्येक जिल्हय़ातील सर्वात लहान मोठय़ा व्यवसायाची माहितीचे संकलन करण्यासाठी यांची निर्मिती होणार असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या काळात सातवी आर्थिक जनगणनेच्या आधारावर या नोंदणी योजनेत माहिती जमा करावी लागणार आहे.
नोंदणी आवश्यक
या नोंदणीमध्ये माल, सेवा क्षेत्रातील उत्पादन आणि वितरणातील सर्व व्यवसायाच्या शाखा आणि संस्थांचा जिल्हावार माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. जीएसटी नेटवर्क, कर्मचारी राज्य विमा निगम, कर्मचारी भविष्य निधी संघटना आणि कॉर्पोरेट क्षेत्रांशी संबंधीत नोंदी या रजिस्टरमध्ये करावी लागणार आहे. ती मंत्रालयास लागणाऱया आकडेवारीसह नियमित अपडेट करावी लागणार असल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीमधून स्पष्ट केले आहे.
एका प्लॅटफॉर्मवर सर्वकाही
या नोंदणी योजना प्लॅटफॉर्मवर वार्षिक आधारावर अपडेट करण्यात येणार आहे. देशातील मजबूत सर्व व्यवसाय शाखा आणि संस्थाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी अर्थमंत्रालयाशी अगोदर संपर्क करावा लागणार आहे.