रेशन कार्डधारकांना सरकारचा दिलासा
07:00 AM Mar 25, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मिळत राहणार रास्त दरात धान्य
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
सातत्याने वाढत असलेल्या महागाईदरम्यान रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. स्वतःचे रेशन कार्ड अद्याप आधारशी लिंक न केलेल्या धारकाला आता 30 जूनपर्यंत रास्त दरातील धान्यासह अन्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
सरकारने रेशन कार्डधारकांच्या सुविधेसाठी रेशन कार्डला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. लाभार्थी आता स्वतःचे रेशन कार्ड 30 जूनपर्यंत आधारशी लिंक करू शकणार आहे. यापूर्वी याची अंतिम मुदत 31 पर्यंत होती.
रेशन कार्डधारकांना सरकारकडून अनेक लाभ मिळत असतात. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना देखील सुरू केली आहे. लाखो लोकांना याचा लाभ मिळत आहे. याद्वारे कुठल्याही राज्यात रेशन कार्डच्या मदतीने रास्त दरात धान्य मिळविता येते.
Advertisement
Next Article