महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिव्होल्यूशन सीटी एक्स्पर्ट मशिनचे आज उद्घाटन!

05:09 AM Jan 25, 2021 IST | Abhijeet Khandekar
कुडाळ : सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरच्या अद्ययावत मशिनबाबत माहिती देताना डॉ. नंदन सामंत, सीए सुनील सौदागर व ऍड. मिहीर भणगे. प्रसाद राणे
Advertisement

कुडाळमधील सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमध्ये सेवा

Advertisement

संचालकांनी दिली माहिती

Advertisement

रुग्णांच्या सेवेसाठी पुढचे पाऊल

अमेरिकन टेक्नॉलॉजी

वार्ताहर / कुडाळ:

कुडाळ येथील सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवून खासगी आरोग्य क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानात झपाटय़ाने बदल होत आहेत. या सेंटरने रुग्णांच्या सेवेसाठी पुढचे पाऊल टाकत सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजीचे अद्ययावत रिव्होल्यूशन सीटी एक्स्पर्ट (32 स्लाईस) मशीन कार्यान्वित केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती रेडिओलॉजी सेंटरचे संचालक डॉ. नंदन सामंत व सीए सुनील सौदागर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमध्ये प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजीचे अद्ययावत रिव्होल्यूशन सिटी मशीन एक्स्पर्ट कार्यान्वित केले आहे. याबाबत येथील हॉटेल स्पाईस कोकण येथे त्यांनी ही माहिती दिली. ऍड. मिहीर भणगे उपस्थित होते.

सौदागर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमार्फत कुडाळ येथे विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्या. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात अद्ययावत सुविधा नसल्याने येथील लोकांना नवीन तंत्रज्ञानानुसार आरोग्य सुविधा देता यावी, हा उद्देश समोर ठेवून माझ्यासह संचालक डॉ. नंदन सामंत, ऍड. अजित भणगे, डॉ. अजय स्वार व डॉ. विवेक रेडकर या पाचजणांनी हे सेंटर सुरू केले. यासाठी सर्व स्तरातून चांगले सहकार्य मिळत आहे.

आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात 2010 मध्ये वाटचाल सुरू केली. प्रथम सिटी स्कॅन मशीन, नंतर आम्ही सर्वांच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात यशस्वी वाटचालीनंतर 2019 मध्ये एमआरआय मशीन याठिकाणी सुरू करून येथील रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू केले, यासाठी सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगून वैद्यकीय क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन रिव्होल्यूशन सीटी एक्स्पर्ट मशीन आणली आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन 25 जानेवारी रोजी येथील मैत्री पार्क इमारतीत माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण व कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे ते म्हणाले.

डॉ. सामंत म्हणाले, आजच्या संगणकीकृत युगात वाटचाल करताना तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात झपाटय़ाने पुढे जात आहे. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेसाठी ही सेवा सुरू केली. एक्स्पर्ट टेक्निशियन म्हणून अक्षय नाडकर्णी कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त चार टेक्निशियन व प्रशिक्षित कर्मचारीही आहेत. गेल्या दहा वर्षांत दीड ते दोन लाख लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानात बदल होत आहेत. पुढील सात-आठ वर्षांचा विचार करून ही नवीन मशीन कार्यान्वित केली आहे. जिल्हय़ातील लोकांना एकाच ठिकाणी सेवा मिळावी, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

रिव्होल्यूशन सिटी एक्स्पर्ट (32 स्लाईस)

रिव्होल्यूशन सिटी एक्स्पर्ट (32 स्लाईस) ही अमेरिकन टेक्नॉलॉजी मशीन विशेष म्हणजे सिंधुदुर्गात प्रथमच कार्यान्वित होत आहे. रत्नागिरी जिल्हय़ातही ही मशीन नाही. या मशिनची पेरीफेरल अँजिओग्राफी, वेगवान व सूक्ष्म स्तरावर परीक्षण, कमीतöकमी रेडिएशन एक्स्पोजर ही खास वैशिष्टये असल्याचे सामंत व सौदागर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article