रिलायन्स-फ्यूचर व्यवहाराचा मार्ग होणार मोकळा
देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट विवाद : दोन्ही बाजूच्या वकीलांचे समझोता करण्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिकेतील दिग्गज ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉन आणि फ्यूचर समूह यांच्यामध्ये तडजोड होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्यातील विवादावर दोन्हीं पक्षाचे वकील हे न्यायालयाच्या बाहेर सल्ला मसलत करुन यावर तोडगा काढणार असल्याची माहिती आहे.
यामुळे दोन्ही कंपन्यांसाठी ही बाब सकारात्मक आहे. दीड वर्षाच्या अगोदर फ्यूचर समूहाने आपला रिटेल व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्यासाठी एक व्यवहार केला होता. मात्र ऍमेझॉनकडून याला विरोध करण्यात आल्यामुळे तेव्हापासून दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात न्यायालयात गेले होते.
सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही पक्षांना 12 दिवसांचा कालावधी दिला आहे. कारण यामध्ये न्यायालयाच्या बाहेर दोघांमध्ये तडजोड करुन योग्य तोडगा काढण्यासाठी हा वेळ देण्यात आल्याचे समजते. या कायदेशीर लढाईमुळे किशोर बियाणी यांचा फ्यूचर समूहा दिवाळखोरीत निघत तो कंगाल होण्याची भिती होती. ऍमेझॉनचे वकिल गोपाल सुब्रमण्यन यांनी म्हटल्याप्रमाणे यातून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात येणार असून आम्ही नेहमी यातून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुढील सुनावणी
या विषयासंदर्भातील पुढील सुनावणी ही येत्या 15 मार्च रोजी होणार असल्याची माहिती आहे. न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे ऍमेझॉन, फ्यूचर रिटेल आणि त्याचे प्रमोटर फ्यूचर कूपन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना या समस्येतून एक मार्ग काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कारण हा मार्ग अंवलबल्यास त्यामधून व्यवसायासाठी फायदेशीर वातावरण निर्माण होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
वादाची सुरुवात का झाली
बियाणी यांनी फ्यूचर कूपन्समधील 49 टक्के हिस्सेदारी ऍमेझॉनला 1500 कोटी रुपयामध्ये विकली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये यावर भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडून हिरवा झेडा मिळाला होता. तसेच ऑगस्ट 2021 मध्ये बियाणी यांनी आपल्या रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक आणि वेयरहाऊसिंग व्यवसाय विकण्यासाठी रिलायन्स रिटेलसोबत 24,713 कोटी रुपयाचा व्यवहार केला होता. तेव्हापासून अमेझॉनशी त्यांचा वाद निर्माण झाला असल्याचे दिसून आले आहे. .