रिलायन्स जिओने सादर केले ऍडव्हान्स असिस्टंट सिस्टम
या सुविधेमुळे अपघातामध्ये घट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
जगातील सर्वात मोठय़ा 15 व्या वाहन मेळावा 2020 च्या पहिल्या दिवशी माडीया इव्हेन्टमध्ये भारत आणि जगातील सर्वात बेस्ट कार सादर करण्यात आल्या आहेत. जगामधील कार निर्मितीत नव नवीन वाहन तंत्रज्ञान आणि आकर्षक कार सादर केल्या आहेत. कारच्या या माहोलमध्ये रिलायन्स जिओने मात्र ‘कनेक्टेड वेहीकल इको सिस्मट’चे सादरीकरण केले आहे. 4-जी कनेक्टिव्हीटीवर आधारीत असणाऱया या इकोसिस्टममध्ये डिव्हाईसेस आणि प्लॅटफार्मसोबत नवीन डाटा ऍनालिटीक्सचेही सादरीकरण केले आहे.
पूर्व सुचनेमुळे मिळणार सुरक्षितता
आपले वाहन चालवणे चांगले आहे का खराब हे आता कनेक्टेड कार आपल्याला सांगणार आहे. डेशकॅमचा डाटा विश्लेषकाच्या माहितीनुसार चालकाला कार चालवत असताना या सुविधेचा योग्य उपयोग होणार आहे. सोबत जिओचा कनेक्टेड कार चालवताना रस्त्यामध्ये येणाऱया धोक्याची पूर्व सुचना मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहन अपघातात घट होत अनेकांची आयुष्य सुखकर होणार आहे. कारमधील इंधन किती शिल्लक आहे, कोणता दरवाजा खुला आहे का बंद आहे यासह अन्य गोष्टीची माहिती आपल्या कनेक्टेडच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कारला टॅक करणे सोपे होणार असून याला वायफायची सुविधा मिळणार आहे.
ऑनबोर्ड डायग्नॉस्टिक कार कनेक्ट
रिलायन्स जिओने ‘ऑनबोर्ड डायग्नॉस्टिक कार कनेक्ट’ या नावाने एक उपकरण वाहन मेळाव्यात सादर केले आाहे. हे उपकरण ऑन बोर्ड पोर्टमध्ये आरामात बसविता येणार आहे. सिमकार्डमधील लॅस उपकरण कारमधील वाय-फाय झोनमध्ये बदलणार आहे. यामुळे 8 मोबाईल किंवा अन्य उपकरणांना जोडता येणार आहे. या सुविधेमुळे कारची प्रत्येक हालचालीची माहिती आपल्या मोबाईवर पाहता येणार आहे.