राशीभविष्य अक्षरयात्रा
दि. 27-7-2025 ते 2-8-2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात`The Chariot' कार्ड तुमच्यासाठी येते आहे, जे संघर्षातून यश मिळवण्याचे सूचक आहे. तुम्ही एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर आहात. जोखीम घ्या, पण नीट विचार करून. कामात स्पर्धा वाढेल, पण तुम्ही विजयी व्हाल. आर्थिक घडामोडी सकारात्मक राहतील. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक. जोडीदाराबरोबर सुसंवाद वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो. नवीन प्रवास घडू शकतो. एखादा जुना मित्र भेटू शकतो. मनात निर्माण झालेल्या संभ्रमाचा निकाल लागेल. आपल्या निर्णयावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास वाढेल.
रोज सकाळी 7 वेळा ‘ॐ अर्हं नम:’ जप करा व लाल रंगाचे वस्त्र परिधान करा.
वृषभ
`Four of Pentacles' हे कार्ड सुचवते की, तुम्ही खूप काही धरून बसले आहात-पैसा, भावना, भीती. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात पण खर्च करण्यास घाबरत आहात. यामुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. नात्यांमध्ये मोकळेपणा ठेवा. जोडीदाराशी बोलताना संयम ठेवा. करिअरमध्ये स्थिरतेचा काळ आहे, पण नवीन काही मिळणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी किंवा जडपणा जाणवेल. मानसिक थकवा येईल. आधीच केलेले काम पूर्ण होईल पण नवे काम सुरू करू नका. घरातील वडीलधारी मंडळींशी मतभेद होऊ शकतात.
शनिवारी काळ्या तिळांचे दान करा व शनिवारी पायाच्या तळव्याला सरसोचे तेल लावा.
मिथुन
या आठवड्यात `The Lovers' हे कार्ड तुमच्यावर कृपादृष्टी करत आहे. प्रेम, संबंध आणि निवडी यांचा काळ आहे. एक महत्त्वाचा निर्णय तुमच्या आयुष्याला दिशा देईल. नवीन नातेसंबंधांची सुऊवात होईल किंवा आधीचे नाते अधिक गहिरे होईल. कामाच्या ठिकाणी टीमवर्कमुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात भागीदारीचे प्रस्ताव येतील. आरोग्य उत्तम राहील पण मानसिक शांतता राखणे आवश्यक. सर्जनशील कामांमध्ये रस वाढेल. मुलांसंबंधी आनंददायक बातमी मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
रोज गुलाबाची अगरबत्ती लावा व शुक्रवारी पांढऱ्या फुलांचे दान करा.
कर्क
`Ten of Wands' हे कार्ड सांगते की, तुम्ही खूप ओझे वाहत आहात. जबाबदाऱ्या जास्त वाटतील. कुटुंब, काम, नाती-सर्वात तोल सांभाळावा लागेल. कामाच्या ठिकाणी मेहनत लागेल पण थकवा येईल. सहकाऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती स्थिर आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. घरात वडीलधाऱ्या मंडळींचे आरोग्य काळजीत टाकेल. भावनिकदृष्ट्या थोडे दूर होण्याची शक्मयता आहे. तुम्ही स्वत:कडे दुर्लक्ष करत आहात. वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे.
रविवार किंवा मंगळवारी अन्नदान करा आणि ‘हनुमान चालीसा’ वाचा.
सिंह
`The Sun' हे सर्वात शुभ कार्ड आहे. यश, समृद्धी, आणि आनंदाचे द्योतक. हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक प्रगतीचे योग आहेत. नवीन गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. कौटुंबिक वातावरण आनंददायक. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्य उत्तम राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखाद्या नवीन गोष्टीची सुऊवात होईल. मुलांबरोबर आनंद मिळेल. नवे लोक भेटतील जे आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतील.
रविवारी सूर्यनमस्कार करा. गूळ व गव्हाचे दान करा.
कन्या
`Seven of Cups' हे कार्ड कल्पनांचे आणि भ्रमांचे प्रतीक आहे. तुम्ही खूप पर्यायांमध्ये अडकलात. निर्णय घेणे कठीण वाटेल. काही गोष्टी आकर्षक वाटतील पण प्रत्यक्षात फसव्या असतील. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीपूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कामात विचलित होऊ नका. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा किंवा निद्रानाश होऊ शकतो. भावनिक अस्थिरता जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतो. मन शांत ठेवा. ध्यान-धारणा उपयोगी ठरेल.
बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घाला व रोज 10 मिनिटे ध्यानधारणा करा.
तूळ
‘`Justice' कार्ड दर्शवते की, यंदा तुमच्यासाठी न्याय आणि समतोल महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी झगडत होतात, त्यात योग्य निकाल मिळण्याची शक्मयता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळू शकते. व्यावसायिक बाबतीत योग्य निर्णय घ्याल. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल. कुटुंबात न्यायभावना ठेवा. जोडीदारासोबत मतभेद संभवतात पण संवाद ठेवल्यास संबंध सुधारतील. शारीरिक आरोग्य चांगले पण मानसिक वातावरण थोडे तणावपूर्ण राहील.
शुक्रवारी शुभ्र वस्त्र परिधान करा व उडीद डाळ दान करा.
वृश्चिक
‘Death'' कार्ड आले असले तरी ते खूप सकारात्मक आहे. जीवनात एका टप्प्याचा अंत आणि नव्या टप्प्याची सुऊवात. जुन्या सवयी, नाती किंवा कामांमधून बाहेर पडा. नवीन सुऊवातीसाठी योग्य वेळ. नोकरीत बदल, शहर बदल किंवा विचारपद्धतीत बदल संभवतो. आर्थिक पुनर्रचना करावी लागेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र होण्याची गरज आहे. आरोग्य सुधारेल, पण जीवनशैली बदलावी लागेल. नवे शिक्षण सुरू कराल.
सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करा व ‘ॐ नम: शिवाय’ चा जप करा.
धनु
`Knight of Wands' कार्ड कृती, ऊर्जा आणि प्रवास दर्शवते. तुम्ही या आठवड्यात धाडसी निर्णय घेऊ शकता. करिअरमध्ये संधींचा फायदा घ्या. नवीन प्रोजेक्ट सुरू करा. परदेशी प्रवासाचे योग. पैशाच्या बाबतीत नवे स्रोत खुले होतील. आरोग्य उत्तम राहील. नवे लोक भेटतील जे तुम्हाला प्रेरणा देतील. प्रेमात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ मिळेल. घरात आनंददायी घडामोडी.
गुऊवारी पिवळे फळ दान करा आणि ‘ॐ बृं बृहस्पतये नम:’ जपा.
मकर
`The Hermit' हे कार्ड अंतर्मुखतेचे आणि आत्मचिंतनाचे प्रतीक आहे. तुम्ही या आठवड्यात स्वत:शी जास्त वेळ घालवाल. आत्मपरीक्षणातून निर्णय घ्या. कामात थोडे मागे राहण्याची शक्मयता आहे. नवीन योजना अजून पूर्णपणे स्पष्ट होणार नाहीत. आर्थिक बाबतीत बचत करा. संबंधांमध्ये थोडे अंतर वाटू शकते. जोडीदारासोबत संवाद कमी होईल. आरोग्य चांगले, पण मानसिक थकवा जाणवेल. ध्यान आणि योग महत्त्वाचे ठरतील.
शनिवारच्या दिवशी उंदीर किंवा कुत्र्याला अन्न द्या व काळ्या वस्त्रात काळी उडीद बांधून वाहत्या पाण्यात सोडा.
कुंभ
`Wheel of Fortune' हे कार्ड मोठ्या बदलांचे आणि संधींचे द्योतक आहे. नशिबाच्या चक्रात एक मोठा फेरफटका येणार आहे. अनपेक्षित लाभ किंवा नुकसान होऊ शकते. त्यामुळे शांत रहा. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. कामात अचानक बदल संभवतो. प्रवासाचे योग. नवे लोक भेटतील. नातेसंबंधात थोडीशी अनिश्चितता. जुने मित्र संपर्कात येतील. आरोग्य स्थिर पण मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.
शनिवार व रविवारी एखाद्या गरीब व्यक्तीला मिठाई व फळे दान करा.
मीन
`The Moon' हे कार्ड भावनांच्या अस्थिरतेचे, भ्रमाचे आणि अंत:प्रेरणेचे प्रतीक आहे. तुमचे विचार प्रगल्भ असले तरी तुम्ही गोंधळात असाल. नातेसंबंधात गैरसमज. निर्णय घेण्यापूर्वी मन शांत ठेवा. स्वप्न, अंत:प्रेरणा यावर विश्वास ठेवा. आर्थिकदृष्ट्या कुठलाही मोठा निर्णय पुढे ढकला. कामात सहकाऱ्यांशी गैरसमज होऊ शकतात. आरोग्यात मानसिक थकवा व निद्रानाश.
सोमवारी चंद्राला कच्चे दूध अर्पण करा व रात्री ‘ॐ चंद्राय नम:’ चा जप करा.