For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजौरी हत्याकांडामागे दहशतवादी अबू हमजा

06:38 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजौरी हत्याकांडामागे दहशतवादी अबू हमजा
Advertisement

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील राजौरी येथील सरकारी कर्मचारी मोहम्मद रझाकच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रतिबंधित संघटनेचा लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी सामील असल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला. त्याचे सांकेतिक नाव अबू हमजा असून तो परदेशी दहशतवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अबू हमजा या दहशतवाद्याचे पोस्टर जारी केले असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 10 लाख ऊपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान विश्वसनीय पुरावे सापडल्यामुळे अबू हमजा या कोड नावाने ‘विदेशी दहशतवादी’ ओळखला गेला. रझाकच्या हत्येनंतर राजौरीमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचदरम्यान अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केलेल्या मोहम्मद रझाकच्या अंत्यविधीसाठी कुंडा टॉप येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.