कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजापूरातील गणेश मुर्तीकारांनी जोपासली अनोखी बांधिलकी

12:34 AM Aug 01, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ राजापूर

Advertisement

गणेशोत्सव तोंडावर असताना अचानक उद्धवलेल्या आजारपणामुळे गणेशमुर्त्यांच्या रेखणीसह रंगकाम कसे करायचे असा प्रश्न राजापूर तालुक्यातील जानशी येथील मुर्तीकार दिलीप जोशी यांच्यासमोर उभा राहिला होता. अशा अडचणीच्या काळामध्ये राजापूर तालुका मुर्तीकार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मुर्तीकारांनी श्री.जोशी यांच्या कारखान्यामध्ये मुर्त्यांच्या रेखणीसह रंगकाम स्वच्छेने करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.  

Advertisement

गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गणेश मुर्तीकारांची कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. परंपरागत मुर्तीकार असलेले जानशी येथील श्री.जोशी परिसरातील गणेशभक्तांसाठी सुमारे साडेचारशे मुर्त्या घडवितात. सद्यस्थितीमध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मुर्त्या घडविण्याचे काम पूर्ण झाले असून त्यांनी रंगकाम सुरू केले होते. अशातच त्यांचा अपघात झाल्याने मुर्त्यांच्या रेखणीसह रंगकाम वेळेत पूर्ण करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. त्यातच, मुर्ती रेखणीचे काम अवघड होते. श्री.जोशी यांची ही समस्या शहरातील मुर्तीकार बाळा तांबट यांना समजली. त्यांनी सहकारी मुर्तीकारांशी याविषयी चर्चा करून श्री.जोशी यांना सहकार्याचा हात पुढे करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळत तालुक्यातील मुर्तीकारांनी विना मोबदला एक दिवस श्री.जोशी यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जानशी येथील त्यांच्या कारखान्यामध्ये जावून बाळा तांबट, काशिनाथ गुरव, यशवंत मांडवकर, विजय मांडवकर, अनु आडविलकर, प्रदीप पालकर, संजय नाटेकर, संजय आयर आदी मुर्तीकारांनी मुर्ती रेखणीसह रंगकाम स्वइच्छेने पूर्ण केले. सहकाऱयाला मदतीचा हात देत मुर्तीकारांनी जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.          

Advertisement
Next Article