रत्नागिरी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे होणार विभाजन
पणन मंत्र्यांच्या आदेशानंतर अहवाल पणनला सादर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील एकमेव असलेल्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार आहे. जिल्हय़ाच्या मंडणगड व राजापूर या दोन टोकाकडील शेतकऱयांना रत्नागिरीतील बाजार समितीचा कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांच्या ठिकाणी कृषी उत्त्पन्न बाजार समिती सुचवण्यात आलेली असून त्या विभाजनाला पणन मंडळाने अनुकूलता दर्शवलेली आहे.
रत्नागिरी जिह्यातील जिल्हा कृषी उप्तन्न बाजार समिती शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आहे. या समितीचे आता विभाजन होणार आहे. रत्नागिरी जिह्याची एकमेक कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी शहरालगत आहे. पण रत्नागिरी जिह्याच्या टोकावरती असणाऱया शेतकऱयांना या कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपयोग शुन्य होत असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे जिह्याच्या सिमेवर म्हणजेच टोकावर असणाऱया तालुक्यांसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा प्रस्ताव पणन मंडळाकडे दिला होता. त्या प्रस्तावाला अनुकुलता दर्शवण्यात येऊन पणन मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा उपनिबंधककडून अहवाल पणनला सादर केला आहे. या विभाजानासाठी खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामध्ये रत्नागिरी शहरालगतची कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून एक कृषी उत्पन्न बाजार समिती मंडणगड तर दुसरी राजापूर मध्ये सुचवण्यात आलेली आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी सर्व्हे करून पणन महामंडळाला सादर केला आहे. रत्नागिरी जिह्यातील एकमेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दापोलीतील शेतकऱयांकडून मोठं उत्पन्न मिळते. त्यामुळे या भागातल्या शेतकऱयांना वेगळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीच्या आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी सर्व्हे करून नवीन बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र कसे असावे याचा अहवाल तयार केला आहे. तो पणन महामंडळालाही सादर केला आहे. त्यामुळे पणन मंडळाकडून ग्रिन सिग्नल आल्यावर लवकरात लवकर मंडणगड आणि राजापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्ग मोकळा होणार आहे.
अशाप्रकारे ठेवलाय विभाजनाचा प्रस्ताव
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या प्रस्तावात रत्नागिरी, राजापूर, लांजासाठी एक बाजार समिती, चिपळूण, संगमेश्वर, गुहागर या तिन तालुक्यांसाठी दुसरी तर दापोली, खेड, मंडणगडसाठी तिसरी समिती स्थापन करावी असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. पणन मंडळाकडून आलेल्या सुचनानुसार बाजार समितीचे व्यवहार चालण्यासाठी आवश्यक उत्पादनही उपनिबंधकांकडून सुचविण्यात आले आहे. रत्नागिरीसाठी मच्छी, चिपळूणसाठी काजू उत्पादन आणि दापोलीसाठी सुपारी पिकाचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यावर पणन मंडळाकडे निर्णय होणार आहे.