महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देशातच शिक्षण?

07:00 AM Mar 04, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य मंत्रालयाचे एनएमसीला पत्र : देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण देण्याची तयारी : केंद्र सरकार शोधतेय मार्ग

Advertisement

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisement

रशिया-युक्रेन युद्ध संकटात अडकलेल्या सुमारे 16 हजार भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याची तयारी आहे. पेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार शुक्रवारी या मुद्दय़ावर महत्त्वाची बैठक होऊ शकते. युक्रेनमधून परतलेल्या या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. याकरता केंद्र सरकारने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसेंसिएट रेग्युलेशन (एफएमजीएल) ऍक्टमध्ये बदल करण्याचा विचार चालविला आहे.

नॅशनल मेडिकल कमिशनला आरोग्य मंत्रालयाकडून एक पत्र लिहिले जाणार आहे. यात एफएमजीएल रेग्युलेशन ऍक्ट-2021 मध्ये बदल करत युक्रेनमधून येणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात येणार आहे. आतापर्यंत विदेशी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसह प्रशिक्षण आणि इंटर्नशिप भारताबाहेर करावे लागते. युक्रेनमध्ये 6 वर्षांचा एमबीबीएसचा अभ्यासक्रम असतो. त्यानंतर 2 वर्षांची इंटर्नशिप करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणात अडथळे निर्माण झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडणार आहे.

खासगी अन् अभिमत महाविद्यालयांचा पर्याय

भारताच्या कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी त्याच वर्षी नीट उत्तीर्ण करावी लागते, तर भारताबाहेरील वैद्यकीय महाविद्यालयात नीट उत्तीर्ण झाल्याच्या तीन वर्षांच्या आत प्रवेश घेता येतो. विदेशातून येणाऱया विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जण हे एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत. विदेशातून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु खासगी, अभिमत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो.

ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय नाही

युक्रेनमध्ये पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याने ऑनलाईन शिक्षण मिळविणे देखील शक्य नाही. याचबरोबर कोरोना काळात चीन अन् अता युक्रेनमधून परतलेल्या सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना एफएमजीएल ऍक्टमधील बदलाचा लाभ मिळू शकतो. 2014 मध्ये क्रीमिया संकटादरम्यान दोन वैद्यकीय महाविद्यालये युद्धक्षेत्रात सापडली होती. तेव्हा तेथे शिकत असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी रशिया आणि काही जणांनी युक्रेनमधील महाविद्यालयाचा पर्याय निवडला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article