म्हादईसाठी कर्नाटककडून आता पंतप्रधानांचे ‘ब्लॅकमेलिंग’
कळसाला परवाने द्या, अन्यथा ‘तमनार’ रोखणार : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा
पणजी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या निवेदनामुळे गोवा राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हादई नदीवरील कळसाभांडुरा प्रकल्पास जोपर्यंत केंद्राकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत गोव्याच्या तमनार वीज प्रकल्पास कर्नाटक सरकार मंजुरी देणार नाही, असे लेखी निवेदन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले आहे. म्हादईच्या प्रश्नावऊन त्यांनी एकंदरित गोवा सरकारलाच आव्हान दिले आहे. म्हादईच्या पाण्यावऊन गोवा व कर्नाटक या दोन्ही राज्यात वाद सुऊ असून सिद्धरामय्या यांच्या वरील निवेदनातून हा वाद विकोपाला जाण्याची लक्षणे आहेत. तमनार वीज प्रकल्प गोव्यासाठी महत्त्वाचा असून तो कर्नाटकातील पश्चिम घाटातून साकार होणार आहे. कळसाभांडुरा प्रकल्प अडवला तर तमनार प्रकल्प रोखू असा एक प्रकारचा धमकीवजा इशारा सिद्धरामय्या यांनी दिला आहे. सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हादई कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी परवाने देण्याची मागणी केली आहे. केंद्राने सदर प्रकल्पास परवाना दिला नाही तर कर्नाटक सरकारही गोवा राज्यात साकार होणाऱ्या तमनार वीज प्रकल्पास मान्यता देणार नाही असे सिद्धरामय्या यांनी पत्रातून बजावले आहे.
तिळारीचे पाणी कर्नाटकला मिळणे अशक्य : मुख्यमंत्री
कर्नाटक आता म्हादईसोबत तिळारी धरणाचे पाणी पळवणार असल्याची बातमी समाज माध्यमावर प्रसारित होत असून ती चुकीची असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. तिळारीचे पाणी गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांसाठीच आहे. तसा करार कऊनच ते धरण बांधले आहे. त्यामुळे ते पाणी कर्नाटकला मिळणे अशक्य असल्याचे सावंत म्हणाले.