महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हसवे येथे अल्पवयीन मुलाचा खून

07:30 AM Dec 09, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुलासोबत अनैर्सिग कृत्य : खून करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात,सातारा पोलिसांनी दोन तासात केला गुन्हा उघडकीस

Advertisement

प्रतिनिधी /सातारा

Advertisement

मोबाईलवरील पॉर्न व्हिडीओ बघून 15 वर्षीय युवकाने पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करुन त्याचे तोंड दाबून खून केल्याची घटना सातारा तालुक्यातील म्हसवे येथे दि. 7 रोजी सायंकाळी घडली. पोलिसांनी केवळ दोनच तासातच कृत्य करणाऱया संशयित अल्पवयीन युवकाच्या मुसक्या आवळल्याची माहिती पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी दिली. विघ्नेश दत्तात्रय चोपडे (वय 5, सध्या रा. म्हसवे, मुळ रा. खुटबाव, ता. माण) शाळेतून सुटल्यानंतर त्या अल्पवयीन युवकाने हे कृत्य केले असल्याचे त्याने कबुली दिली असून त्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे म्हणाले, काल सायंकाळी म्हसवे गावच्या हद्दीत पाच वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याचे तालुका पोलिसांना काल सांयकाळी माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्या पाच वर्षाच्या मृत बालकाच्या अंगात कमरेखालची कपडे नव्हती. त्यामुळे अनैसर्गिक कृत्य झाल्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक कापरे, मोहन पवार, पो. कॉ. रोहित निकम, वैभव सांवत यांनी गावात चौकशी केली. त्याच परिसरातील 15 वर्षाच्या युवक भेदरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास गोडीगुलाबीत खोदून खोदून विचारणा केली असता त्याने केलेले कृत्य कबुल केले. त्याच्याविरुद्ध मृत बालकाच्या वडिलांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

त्या अल्पवयीन युवकास मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पहाण्याची विकृत सवय

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता खून झालेल्या बालकाचे आई,  वडील हे मोलमजुरीनिमित्ताने म्हसवे येथे भाडय़ाच्या घरात राहत आहेत. वडिल दत्तात्रय हे गंवडी असून त्यांची पत्नी ही मोलमजुरी करते. ते दोघेही दि. 7 रेजी कामावर गेले होते. कामावरुन आल्यानंतर त्यांना त्यांचा पाच वर्षाच्या विघ्नेशचा मृतदेह आढळून आल्याचे समजताच आई, वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला. ज्याने खून केला आहे त्याचे आईवडील ही मोलमजुरी करुन म्हसवे येथेच स्थायिक झाले आहेत. संशयित आरोपी हा शाळेतून आल्यानंतर दप्तर घरात ठेवून मोबाईल घेऊन बाथरुममध्ये गेला होता. बराच वेळ बाथरुममध्ये होता. तेथून तो बाहेर आला अन् त्याने विघ्नेशला गाठले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य त्याने केले. हे कृत्य करताना विघ्नेशने आरडाओरडा केल्याने त्याचे तोंड दाबण्यात आले. त्यामध्ये विघ्नेशाचा श्वास गुदमरुन जागीच मृत्यू झाला. तेव्हा तो मयत झाल्याचे त्या अल्पवयीन युवकाच्या निदर्शनास येताच त्याने तेथून काढता पाय घेतला. त्याला गेल्या एक वर्षापासून मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पहाण्याची सवय त्याच्यापेक्षा एका वर्षाने लहान असलेल्या मित्राने लावल्याचे त्याने सांगितले. मृत बालकाचा पंचनामा व इतर तपासण्याही करण्यात आल्या असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी सांगितले.

दोन तासात छडा लावणारे पथक

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे रजेवर असले तरीही त्यांच्या रजेच्या काळात सातारा पोलीस दल हे डिटेक्शनमध्ये सक्षम आहे हे या प्रकरणावरुन दिसून येते. अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व डीवायएसपी गणेश किर्दे यांनी स्वतः लक्ष घातल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो. ना. मुनील मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, पो. कॉ. रोहित निकम, वैभव सावंत, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, अमित पाटील, हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक नितीराज थोरात, मालोजी चव्हाण, सतीश पवार यांनी सहभाग घेतला. सर्व पथकातील जवानांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी अभिनंदन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article