For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूड नसेल तर नका येऊ ऑफिसमध्ये

06:32 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मूड नसेल तर नका येऊ ऑफिसमध्ये
Advertisement

कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय अनहॅप्पी लीव्ह

Advertisement

नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये एक समस्या नेहमी असते. त्यांच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरीही त्यांना ऑफिसमध्ये पेहोचायचे असते आणि लक्ष देऊन काम करावे लागते. कुठलीही घरगुती समस्या असो, किंवा कुणासोबत भांडण झालेले असो किंवा प्रेमभंग झाला असो याचा कार्यालयीन कामकाजावर प्रभाव पडू नये अशी अपेक्षा केली जाते, अशा स्थितीत चीनमधील एका कंपनीच्या मालकाने घेतलेली भूमिका थक्क करणारी आहे.

वर्क-लाईफ बॅलेन्स

Advertisement

चीनमध्ये एका रिटेल टायकूनने कर्मचाऱ्यांना उत्तम वर्क लाइफ बॅलेन्स प्राप्त करण्यासाठी ‘अनहॅप्पी लीव्ह’ देण्याचे पाऊल उचलले आहे. यू डोंगलाई हे मध्य चीनच्या हेनान प्रांतातील एक रिटेल चेन, पँग डोंग लाईचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. यू डोंगलाई यांनी कर्मचाऱ्याचा मूड चांगला नसेल तर तो 10 दिवसांच्या सुटीस पात्र ठरणार असल्याची घोषणा केली आहे.

आनंदी नसाल तर कामावर नका येऊ

प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य मिळावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, जेव्हा ते आनंदी नसतात. याचमुळे तुम्ही आनंदी नसाल तर कामावर येऊ नका. कर्मचाऱ्याने स्वत:च्या आरामाची वेळ मोकळेपणाने निश्चित करावी, कामाव्यतिरिक्त सर्वांना पुरेसा आराम मिळावा. व्यवस्थापनाकडून अनहॅप्पी लीव्हचा प्रस्ताव नाकारला जाऊ शकत नसल्याचे यू डोंगलाई यांनी म्हटले आहे.

कंपनीत नवी कार्यसंस्कृती

अनहॅप्पी लीव्हच्या कल्पनेला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळाल आहे. इतका चांगला बॉस आणि या कंपनीच्या संस्कृतीला देशभरात प्रचारित केले जावे असे एका युजरने म्हटले आहे. मी या कंपनीत रुजू होऊ इच्छितो. तेथे मला आनंद आणि सन्मान मिळेल असे अन्य एकाने नमूद केले आहे. चीनमध्ये 65 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामाच्या ठिकाणी थकलेले आणि दु:खी असतात असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ओव्हरटाइम काम करविणे अनैतिक कर्मचाऱ्यांनी आरोग्यदायी जगावे

दीर्घकाळापर्यंत काम करण्यात यावे अशी भूमिका घेणाऱ्या चिनी मालकांवर यू यांनी यापूर्वी टीका केली होती. कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाइम काम करवून घेणे अनैतिक आहे. अन्य लोकांच्या विकासाच्या संधींचे उल्लंघन आहे. कर्मचाऱ्यांनी केवळ 7 तास काम करावे. आठवड्यात सुटी घ्यावी, वर्षाला 30-40 दिवस सुटी देण्यात यावी. लूनर न्यू ईयरदरम्यान 5 दिवसांची सुटीही त्यांना देण्यात यावी. आमच्या कंपनीने मोठे होण्याऐवजी आमचे कर्मचारी आरोग्यदायी रहावेत अशी आमची इच्छा असल्याचे यू डोंगलाई यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.