महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई इंडियन्सचा मुकाबला आज घातक सनरायझर्सशी

06:56 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

मुंबई इंडियन्स आज बुधवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोकादायक सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. सलामीच्या सामन्यात सहज गाठता येणारे लक्ष्य साध्य करण्यात अपयश आल्यानंतर आता मुंबईचा संघ निश्चितच दणदणीत विजय नोंदविण्याचे लक्ष्य बाळगून मैदानात उतरणार आहे.

Advertisement

पाच वेळच्या विजेत्या मुंबईच्या गुजरात टायटन्सविऊद्धच्या सलामीच्या लढतीत त्यांच्या दृष्टीने काही गोष्टी चांगल्या घडल्या होत्या. त्यात वेगवान गोलंदाज बुमराहचे भेदक स्पेल, डेवाल्ड ब्रेव्हिसची प्रभावी खेळी आणि वरच्या फळीत रोहित शर्माने केलेली आतषबाजी यांचा समावेश होतो. परंतु गेल्या काही वर्षांत ‘स्लो स्टार्टर्स’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या मुंबईला सात गडी असतानाही 36 चेंडूंत 48 धावा करता आल्या नाहीत. यंदाची स्पर्धा पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक असल्याने मुंबईला यापुढे अशी निराशाजनक कामगिरी परवडणार नाही.

मुंबईचा कर्णधार या नात्याने आपल्या पहिल्या सामन्यात हार्दिकने टीम डेव्हिड आणि ब्रेव्हिस यांना आधी पाठवण्यासाठी स्वत:ला सातव्या क्रमांकावर ढकलले. गेल्या वर्षी त्याने गुजरात टायटन्सतर्फे खेळताना खूप वरच्या स्थानावर येऊन फलंदाजी केली होती. हे लक्षात घेता वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करण्यास त्याला सबळ कारण आहे. दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरलेला सलामीवीर इशान किशन टायटन्सविरुद्ध केवळ चार चेंडू टिकू शकला. राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्याला फलंदाजी आणि यष्टिरक्षणात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल.

हार्दिकला फिरकीपटू शम्स मुलानी आणि पियूष चावला यांच्याकडूनही सुधारित कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईचा सामना ‘सनरायझर्स’शी त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील या संघाने कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. तडाखेबंद फलंदाज हेन्रिक क्लासेनने त्यांना निराशाजनक परिस्थितीतून जवळजवळ बाहेर काढले होते. मात्र उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने आश्वासक चित्र दाखविलेले आहे. परंतु जर सनरायझर्सला स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल, तर या सलामीवीरांनी सातत्य राखणे आवश्यक आहे. पिंच हिटर अब्दुल समदवर त्यांनी भरपूर विश्वास दाखविलेला असून आता त्या खेळाडूने या विश्वासाला जागण्याची वेळ आली आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारला शनिवारी आंद्रे रसेलचा सामना करावा लागला होता. आजच्या सामन्यातून जोरदार पुनरागमन करण्याचा तो प्रयत्न करेल.

संघ : मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वूड, सूर्यकुमार यादव.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, जयदेव उनादकट, आकाश सिंग, जथवेध सुब्रमण्यन.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article