महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मास्क न वापरणाऱयांवर 2 दिवसात कारवाई

06:31 AM Jan 08, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ चिपळूण

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. सध्या 115 जणांना लागण झाली आहे. त्यातील 5 जणांवर रूग्णालयात, तर 110 जणांवर घरातच उपचार सुरू आहेत. हा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या प्रशासन खबरदारी घेत आहे. सध्या मास्क वापरा, अन्यथा 2 दिवसांत दंडाची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना दिला जात आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते. असे असताना आता पुन्हा कोरोनाने जोर धरला आहे. दिवसाला अनेक रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आरटीपीसीआर व ऍन्टीजेन चाचण्या करण्यावर भर दिला आहे. एका मोबाईल व्हॅनसह नागरी सुविधा केंद्र, कामथे उपजिल्हा रूग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी हॉस्पिटलमध्ये या चाचण्या होत आहेत. त्यानुसार सध्या शहरात 40, तर तालुक्यात 115 रूग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील 110 रूग्णांना कोणताही गंभीर त्रास होत नसल्याने घरात तर उर्वरित 5जणांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाने विश्रांती घेतल्याने मास्क लावण्यासह अन्य नियम नागरिकांनी बासनात गुंडाळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू नये म्हणून मास्क लावा, अशी समज सध्या मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे बापू साडविलकर, राजेंद्र खातू, विराज सकपाळ, राकेश कांबळे आदींचे पथक देत आहे. तरीही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास दंडाची तर तो भरण्यास नकार दिल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

बॅंक ऑफ इंडियाचा कारभार झाला विस्कळीत

बँक ऑफ इंडियाच्या शहरात असलेल्या दोन व खेर्डी येथील शाखांमधून मिळणाऱया सेवेबाबत ग्राहक कायमच नाराज असतात. असे असताना आता याच बंकेच्या काही शाखांमध्ये पहिल्यांदा कर्मचारी बाधित असल्याचे दिसले आहे. येथे 5 कर्मचाऱयांना लागण झाली आहे. त्यामुळे या बंकेचा कारभार आणखीनच विस्कळीत झाला आहे.

अलोरेत मास्क वापरणाऱयावर पहिला गुन्हा

जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन मास्क न लावता खाद्यपदार्थांची विक्री करत असल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात विरेंद्र अजित मोहिते (30, तळसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची †िफर्याद अलोरे शिरगाव पोलीस स्थानक पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन न करता तसेच कोणतीही खबरदारी न घेता जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन आपल्या कृतीमुळे कोरोना विषाणू रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असूनही मास्क न लावता हॉटेलमध्ये थांबून गर्दी करुन खाद्यपदार्थाची विक्री करीत असताना आढळला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article