मालवणी माणसाच्या कार्याचा नौदलाकडून सन्मान
नूतनीकरणानंतर ‘आयएनएस करंज’ पाणबुडी पुन्हा सेवेत : 1969 साली रशियातून आणली होती भारतात
कोकणचे सुपुत्र कॅ. मोहन सामंत यांच्या कार्याचा असाही गौरव
मनोज चव्हाण / मुंबई:
येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या कॅ. मोहन सामंत या मालवणी माणसाने भारतीय नौदलात मोठी कामगिरी बजावून ‘आयएनएस करंज’ ही पाणबुडी 1969 साली रशियातून विशाखापट्टणम् येथे 83 दिवसांचा प्रवास करून आणली. त्यानंतर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यामध्ये अग्रक्रमावर कार्यरत राहिली. 1971 च्या भारत-पाक युद्धात आयएनएस करंजचा वापर करण्यात आला होता. तब्बल 50 वर्षांनंतर नूतनीकरण करून कॅ. कै. मोहन सामंत यांच्या पत्नी निर्मलाताई सामंत यांच्या हस्ते बुधवारी सकाळी मुंबई येथील नेवल डॉक येथे ती नौदलाच्या सेवेत रुजू झाली.
भारतीय नौदलातील महावीरचक्र विजेते कॅ. मोहन नारायणराव सामंत यांचा जन्म वसई येथे 19 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल येथे झाले. परुळे येथील ते रहिवासी होते. मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यावर नौदलाच्या परीक्षेत यशस्वी होऊन ते इंग्लंडला ट्रेनिंगला गेले. पूर्व पाकिस्तान जे आता बांग्लादेश म्हणून ओळखले जाते, त्याच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षामध्ये आयएनएस करंज सज्ज झाली होती. या कामगिरीसाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते ‘महावीरचक्र’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. मालवणीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते. त्यांचे औदार्य वाखाणण्याजोगे होते. औदार्यासह टोकाची शिस्त यामुळे ते यशस्वी ठरले.
रशियात घेतले पाणबुडीचे शिक्षण
मोहन सामंत हे रशियाला पाणबुडीचे शिक्षण घेण्यास गेले होते. तेथून आयएनएस करंज नावाची पाणबुडी हिंदुस्थानात 1969 साली विशाखापट्टणम् येथे 83 दिवसांचा प्रवास करून आणली. या सर्व कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी विशाखापट्टणम् येथे पोस्टाने फर्स्ट डे कव्हर म्हणून इनव्हलप प्रसिद्ध केले. बांग्लादेशमध्येही दोनवेळा त्यांचा सत्कार करण्यात आला.
2019 साली त्यांनी संदीप उन्नीनन यांच्या मदतीने पूर्व पाकिस्तान बरोबरच्या लढाईचे वर्णन आणि अनुभव ‘ऑपरेशन’ या नावाने प्रसिद्ध केले. मोहन सामंत यांचे वडील नारायणराव सामंत दुसऱया महायुद्धात इंग्लडच्या बाजूने लढत असताना जर्मनीमध्ये पकडले गेले. चार वर्षे ते तेथे कैदेत होते. सामंत कुटुंबीय नंतर पुण्यात स्थायिक झाले. मोहन यांच्या कर्तृत्वामागे सदैव उभी असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे पत्नी निर्मला. भारतीय नौदलाने त्यांच्या हस्ते या पाणबुडीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करून सामंत कुटुंबियांचा गौरवच केला आहे.
आमच्यासाठी आनंद सोहळा-निर्मलाताई
माझे पती मोहन सामंत यांनी देशाची केलेली सेवा आणि नौदलाने आम्हा कुटुंबियांना दिलेला सन्मान याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. या सोहळय़ाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. भारतीय नौदल हे देशाची मजबूत ताकद आहे. नौदलातील शिस्त आणि त्यांचे कर्तृत्व मी जवळून पाहिले आहे. मोहन यांच्यामुळे मला मिळालेला सन्मान हा देशातील प्रत्येक पत्नी, मातेचा असल्याचे मी मानते, अशा शब्दांत निर्मलाताई सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयएनएस ‘करंज’विषयी
‘आयएनएस करंज’ सीडीआर एमएनआर सामंत यांनी 4 सप्टेंबर 1969 रोजी भारतात आणली. यूएसएसआरकडून खरेदी केलेल्या फॉक्सट्रॉट क्लास सनबॅमरीन्स (प्रोजेक्ट 10) मधील ती तिसरी होती. रिगा ते विशाखापट्टणमला 83 दिवस एस्कॉर्ट जहाज देऊन स्वतंत्रपणे पोस्ट कमिशनवरून प्रवास करणारी ती पहिली पाणबुडी होती. आगमन झाल्यावर आयएनएस कराजन इस्टर्न नेव्हल कमांडच्या 8 पाणबुडी पथकात सामील झाल्या. सर्व मोठी ऑपरेशन्स आणि असंख्य सरावांमध्ये पाणबुडीवर मोठय़ा प्रमाणात शस्त्रs तैनात केली होती. पाणबुडीने तीन दशकांहून अधिक काळ देशातील इस्टरटेम आणि वेस्टरम सीबार्ड्सवरील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण केले आहे.
तिसरी स्कॉर्पिन वर्ग पाणबुडी सेवेत दाखल
भारतीय नौदलाची तिसरी स्कॉर्पिन वर्ग पाणबुडी आयएनएस करंज बुधवारी सेवेत दाखल झाली. 1971 च्या भारत-पाक युद्धावेळी जुन्या करंजचे कमिशनिंग ऑफिसर आणि नंतर कमांडिंग ऑफिसर असलेले नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल व्ही. शेखावत हे नेव्हल डॉकयार्डमधील समारंभासाठी प्रमुख पाहुणे होते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने मॅझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबईतर्फे सहा स्कॉर्पिन क्लास पाणबुडय़ा भारतात तयार केल्या जात आहेत.