मार्च एन्डची धावाधाव अन् पालकमंत्र्यांची आढावा बैठक! जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा, कॅबिनेटमुळे बैठक रद्द
सांगली प्रतिनिधी
मार्च अखेर महिना-दीड महिन्यावर आल्याने जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. असे असताना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बुधवारी आढावा बैठक बोलाविली होती. मात्र कॅबिनेटची बैठक असल्याने ही बैठक रद्द झाली. मार्च अखेरच्या लगीनघाईत पालकमंत्र्यांनी बैठक बोलाविल्याने जि. प. मध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सप्टेंबर मा†हन्यात झेडपीत आढावा बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला आमदार, खासदार यांना बैठकीला ा†नमंत्रण न ा†दल्याने पुन्हा पंधरा ा†दवसांत बैठक घेण्याची सूचना केली होती. यानंतर बैठकच झाली नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तब्बल पाच महिन्यांनी बैठक घेण्यार असल्याचे लेखी कळविले होते. ही बैठक बुधवारी ा†जल्हा पा†रषदेच्या सभागृहात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता होणार होती. या बैठकीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जि. प च्या सर्व खातेप्रमुख तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंत्यांसह संबधित अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बैठकीची तयारी केली होती. ा†जल्हा वार्षिक योजनेतून आलेला लाखों ऊपयांचा ा†नधी शलक आहे. ा†नधी खर्चासाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे मार्चअखेरसाठी 47 ा†दवस ा†शलक आहे. मुख्य कार्यकारी आ†धकारी धोडा†मसे यांच्या सुचनेनुसार अधिकाऱ्यांनी ा†नधी वेळेत खर्च होण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग केले आहे. त्यादृष्टीने सीईओ सातत्याने आढावा घेत आहेत. असे असताना मार्च अखेरच्या लगीन घाईमध्ये पालकमंत्र्यांनी बैठक बोलाविली होती.
कॅबिनेट बैठकीसाठी पालकमंत्री रात्रीच महालक्ष्मीने मुंबईला रवाना झाले. रात्रीपर्यंत बैठक रद्द झाल्याबाबत अधिकाऱ्यांनी कळविण्यात आले नव्हते. मार्चच्या घाईत बैठकीच्या तयारीत अधिकाऱ्यांचा वेळ गेला. दरम्यान मार्च अखेरची घाई सुरू असताना आत्ता बैठक घेतली जात असल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.