‘मारुती’ डिसेंबर तिमाहीत नफ्यात
मागील सहा तिमाहीनंतर प्रथमच नफा कमाईची नोंद
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीला ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत 1,587.4 कोटी रुपये कंसोलिडेटेड नफा झाला आहे. 2018 च्या डिसेंबर तिमाहीत नफा 1,524.5 कोटी झाला होता. त्याच्यापेक्षा हा 4.13 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीचा महसूल 5.29 टक्क्यांनी वाढून 20,721.8 कोटी रुपयावर राहिला आहे. हाच आकडा डिसेंबर तिमाही 2018 मध्ये 19,680.7 कोटी रुपये होता. अशी माहिती मंगळवारी कंपनीने दिली आहे. कंपनीला मागील सहा तिमाहीनंतर प्रथमच नफा झाल्याची नोंद केली आहे.
सप्टेंबर तिमाही नफा 39 टक्क्यांनी घसरला
स्टँडअलोन नफा 5.1 टक्क्यांनी वाढून 1,565 कोटी रुपये आणि महसूल 5.3 टक्क्यांनी वाढून 20,707 कोटी रुपये राहिला आहे. मागील तिमाहीत कंपनीचा कर खर्च 441.6 कोटी रुपये होता.
देशातील बाजारातील वाहन विक्री
मागील तिमाहीमध्ये मारुतीने एकूण 4 लाख 37 हजार 361 वाहनांची विक्री झाली. देशामध्ये 4 लाख 13 हजार 698 गाडय़ा विकल्या आहेत. कंपनीने 23 हजार 666 वाहन निर्यात केली आहे.