महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणच्या तहसीलदार, प्रांताधिकाऱयांना कारणे दाखवा नोटिसा

07:00 AM Mar 04, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी जिल्हाधिकाऱयांनी मागितला लेखी खुलासा, चार तलाठय़ांना नोटिसा,माणचे रिचर्ड यानथन नवे तहसीलदार

Advertisement

प्रतिनिधी /म्हसवड

Advertisement

वाकी (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रात दि. 22/2/2022 रोजी उपविभागीय अधिकाऱयांनी गौण खनिज, वाळू उत्खननप्रकरणी कारवाईसाठी नियुक्त केलेल्या तहसीलदार, तलाठी, यांनी एका ट्रक्टरवर कारवाई करुन म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी चार तास मंडल अधिकारी शेडे बसले होते. मात्र सहाय्यक पोलीस अधिकाऱयांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याबाबत तहसीलदारांना या माहिती देण्यासाठी फोन केले. मात्र फोन उचलले तर तलाठी यांनी कारवाई करु नये यासाठी प्रयत्न करुन कामात कसुर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱयांनी तहसीलदार, चार तलाठी यांना 24 तासाच्या आत समक्ष येऊन खुलासा करण्याबाबतची नोटीस बजावली आहे. या नोटिसीची चर्चा असताना माणचा तहसीलदार पदाचा पदभार अचानक नवीन तहसीलदारांनी स्वीकारला आहे. त्यामुळे माणचे तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केले, बदली केली की सक्तीच्या रजेवर पाठवले याबाबत तर्कवितर्क विचारले जात आहेत.

  याबाबत मिळालेली माहिती याप्रमाणे, दि. 22/2/2022 रोजी रात्री 1.20 च्या दरम्यान वाकी माणगंगा नदीपात्रात चार तलाठी व मंडलाधिकारी शेंडे यांच्या भरारी पथकाने एका ट्रक्टरवर जप्तीची कारवाई करुन दि. 23/2/2022 रोजी सांयकाळी 6.30 ते 9.05 पर्यंत मंडल अधिकारी शेंडे म्हसवड पोलीस ठाण्यात आणला. मात्र म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकाऱयांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याबाबत तहसीलदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी चार तासात एकदाही फोन उचलला नाही तर दुसरीकडे तलाठय़ांनी कारवाई करु नये यासाठी प्रयत्न केले. याबाबतचे व्हीडीओ व ओडिओ संभाषण सर्व ग्रुपवर व्हायरल झाले. व्हायरल झालेले व्हिडीओ व ऑडिओ जिल्हाधिकाऱयांनी या घटनेतील मंडल अधिकाऱयांना सातारा येथे बोलवून माहिती घेतली व संबधित प्रांताधिकारी, तहसीलदार, चार तलाठी यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व तलाठी यांना 24 तासाच्या आत समक्ष येऊन खुलासा देण्यासंबधी कारणे दाखवा नोटीस 24/2/2022 रोजी काढली होती.

गुरुवारी अचानक माणचे तहसीलदार तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या जागी रिचर्ड यानथन यांनी पदभार स्वीकारला. तत्कालीन तहसीलदार सुर्यकांत येवले व तलाठी यांच्यावर नक्की कारवाई काय झाली बदली झाली, निलंबित केले कि सक्तीच्या रजेवर पाठवले याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article