महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महुआ मोइत्रा यांना ईडीकडून आणखी एक समन्स

06:22 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 मार्चला चौकशीसाठी हजर रहावे लागणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तृणमूल नेत्या महुआ मोइत्रा यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. ईडीने विदेशी चलन व्यवस्थापन अधिनियमाच्या (फेमा) उल्लंघनाप्रकरणी महुआ मोइत्रा यांना पुन्हा समन्स बजावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने महुआ यांना 28 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

यापूर्वी 19 मार्च रोजी ईडीकडून मोइत्रा यांना समन्स बजावण्यात आला होता.  या समन्सचे पालन न करण्यात आल्याने नवा समन्स जारी करण्यात आला आहे. महुआ यांनी यापूर्वी ईडीला पत्र लिहून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली होती.

ईडी फेमाच्या तरतुदींतंर्गत महुआ यांचा जबाब नोंद करू इच्छित आहे. महुआ यांच्या विरोधात एनआरआय खात्याशी निगडित देवाणघेवाणीची चौकशी करत आहे. याचबरोबर विदेशात पैसे पाठविण्याच्या काही अन्य प्रकरणांमध्येही चौकशी सुरू आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावर अनेक आरोप केले होते. महुआ यांनी व्यावसायिक हीरानंदानी यांच्याकडून महागड्या भेटवस्तू आणि पैसे घेत अदानी समूह तसेच पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारले होते असा आरोप आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article