महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रकडूनही म्हादईचे पाणी पळविण्याची तयारी

06:42 AM Apr 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विर्डी - दोडामार्ग धरण प्रकल्पावर जोरात काम पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर यांची प्रत्यक्ष भेट

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

म्हादईचे पाणी कर्नाटकने पळवल्यानंतर आता महाराष्ट्र देखील तिचे पाणी वळवण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. दोडामार्ग - सिंधुदुर्ग येथे विर्डी धरणाचे बांधकाम महाराष्ट्र सरकारने सुऊ केल्याचे वृत्त हाती आले आहे. पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर यांनी ते काम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला असून त्यासाठी परवाने घेतले नसल्याचे म्हटले आहे. पाणी वाटपाचा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना महाराष्ट्र सरकारची सदर कृती अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

म्हादईच्या पाणी वाटपाचा प्रश्न गोव्यासह महाराष्ट्र - कर्नाटक अशा एकूण तिन्ही राज्यात रेंगाळत पडला असून कर्नाटकमध्ये तर पुढील मे महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने तेथील भाजप सरकारने तो प्रमुख मुद्दा बनवला आहे. त्याचे मुख्dयामंत्री तर प्रमुख प्रचारसभेत म्हादईचे पाणी वळवण्याची, कळसा - भांडुरा प्रकल्प पूर्ण करण्याचीच भाषा बोलत आहेत. कर्नाटकचा आदर्श घेऊन महाराष्ट्राने देखील आता एक पाऊल पुढे टाकून विर्डी धरणाचे काम सुऊ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गोवा सरकार न्यायालयावर निर्भर

गोव्यातील सरकार मात्र न्यायालयीन लढाईवर निर्भर राहिले असून गोव्याची बाजू बळकट असल्याचा दावा कऊन गप्प बसल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्नाटकने कळसा - भांडुरा प्रकल्पाचा डिपीआर केंद्राला सादर कऊन त्यास मान्यता मिळवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकची काही ना काही कृती चालू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु म्हादईचे पाणी राखण्यासाठी गोवा सरकारने प्रत्यक्षात कामाला कुठेच हात घातलेला नाही. म्हादई नदीवर धरणे बांधणार म्हणून फक्त बोळवण चालू आहे, परंतु त्यासाठीची कामे मात्र कुठेच चालू असल्याचे दिसत नाही.

राजेंद्र केरकर हे स्वत: विर्डी धरणाच्या कामास भेट देऊन आले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील काम वेगाने सुऊ आहे. विविध प्रकारची यंत्रणा तेथे राबत असून म्हादईचे पाणी वळवावे म्हणूनच ते काम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकनंतर आता महाराष्ट्राने जर म्हादईचे पाणी पळवले तर गोव्यासाठी म्हादई शिल्लक राहाणार काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article