For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या मुंबईतील विक्री दालनांमध्ये विस्तार

08:34 PM Jan 20, 2020 IST | Tarun Bharat Portal
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या मुंबईतील विक्री दालनांमध्ये विस्तार
New Delhi: Finance Minister Nirmala Sitharama(4L), Minister of State for Finance Anurag Singh Thakur(3L), Finance Secretary Rajiv Kumar(2L), Economic Affairs Secretary Atanu Chakraborty and others during 'Halwa' ceremony marking the commencement of Budget printing process for the General Budget 2019-20, in New Delhi, Monday, Jan. 20, 2020. (PTI Photo/Shahbaz Khan)(PTI1_20_2020_000076B)
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

जगभरात 250 हून अधिक विक्री दालनांचे सशक्त जाळे असलेली सर्वात मोठी आभूषण विपेती नाममुद्रा ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ने मुंबईतील आपले दुसरे दालन 18 जानेवारी रोजी सुरू केले. लोअर परळस्थित नॉर्थ स्कायझोन, हाय स्ट्रीट फिनिक्स येथील या दालनाचे उद्घाटन मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद आणि फिनिक्स मिल्स लिमिटेडचे अध्यक्ष अतुल अशोककुमार रूईया यांच्यासह समूहातील अनेक महत्त्वाचे अधिकारी, मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने चालू वर्षभरात देशभरात 35 नवीन विक्री दालने सुरू करण्याच्या आखलेल्या नियोजनातूनच हे नवीन शोरूम सुरू झाले आहे. मुंबई महानगराच्या सीमांबाहेरही अस्तित्व फैलावताना समूहाने ठाणे आणि नवी मुंबई येथेही नवीन दालनांचे नियोजन आखले आहे. या नवीन शोरूममध्ये सोने, हिरेजडित आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचे अनोखे संग्रहण प्रस्तुत केले जाईल. त्याचप्रमाणे या दालनाच्या शुभारंभानिमित्त मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ग्राहकांसाठी विशेष शुभारंभी योजनाही आखली आहे.

Advertisement

Advertisement

.