For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली रस्त्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांची भेट

11:21 AM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली रस्त्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांची भेट
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडले व काही ठिकाणी रस्ते वाहून गेले.यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री.रत्नाकर बामणे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.व यासंदर्भात त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून काही रस्ते हे ठेकेदार यांनी अर्धवट सोडलेले आहेत.रस्त्याची डागडुजी करणे.ही ठेकेदाराची जबाबदारी असून ते करत नाही.तसेच काही रस्ते नामंजूर झालेले आहेत. परंतु याची कल्पना संबंधित ग्रामपंचायतींना दिली नसल्यामुळे लोक रस्ते होणार या आशेने ग्रामपंचायत कडे पाहत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, साईड पट्टी, गटारे,आदी कामे डिसेंबर पूर्वी पूर्ण करा तसेच जे रस्ते पूर्ण झालेले आहेत. त्या त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कल्पना देऊन रस्त्याबाबत एक समिती गठीत करा व त्या समितीमार्फत रस्त्याबाबत असणारे समस्यांचे निवारण करा. अशी मागणी ही त्यांनी कार्यकारी अभियंता श्री. बामणे यांच्याकडे केली. तसे न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते केले गेलेत त्या ठिकाणी त्या त्या तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलने करण्यात येईल असा इशाराही मनसेने दिला. यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ मनसेचे माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कुडाळ माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावर आपल्या निवेदनाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला श्री बामणे यांनी दिले.

Advertisement

Advertisement

.