भ्रम पसरविणाऱया जाहिरातींवर बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकांना बजारातील आपलेच उत्पादन खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या विविध आमिष दाखवण्यासाठी विविध प्रकराच्या जाहिराती बनवत असतात, त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी क्षेत्र म्हणजे गोरेपणा होण्यासाठी असणारी उत्पादने आणि लैगिंक शक्ती वाढविणाऱया उत्पादनावर लवकरच बंदी घालणारा कायदा तयार करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून (आपत्तीजनक जाहिराती अधिनियम 1954) नुसार संशोधनात्मक मसूदा सादर करण्यात आला आहे.
अशक्य वाटणाऱया आजारांवर उपचार करणारी औषध, आपले शरीर गोरे बनविणारे, लैगिंक शक्ती वाढविणारे, बुद्धीची क्षमता वाढविणे, आणि वृद्धत्व न येणारे इलाज उपलब्ध असणाऱया जाहिराती तयार करण्यावर बंदी घालण्याचा अंदाज आहे. आणि जर अशा जाहिराती दिल्या तर संबंधीताना पाच वर्षांचा तुरुगवास आणि 50 लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक्स-डिजिटल माध्यम
कायद्याच्या संशोधनानुसार प्रिन्ट माडियामधील कक्षा वाढवून ती इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांपर्यत वाढविण्यात येत आहे. यासोबतच ऍलोपॅथिकसोडून अन्य होमिओपॅथिक, आयुर्वेदसह अन्य औषधांनाही नवीन कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
विविध उत्पादनांच्या जाहिरातीवर बंदी
जाहिरात संशोधनाशी संबंधीत कायद्यानुसार पहिल्यापासून ज्या आजारांच्या जाहिरावर बंदी घातली आहे, त्यासोबतच अन्य 78 आजारांवर उपचार करणाऱया औषधांच्या उत्पादनांच्या जाहिरात करणे बंद होणार आहे.