महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय पुरुष तिरंदाजी संघ पुढील फेरीत

06:17 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)

Advertisement

येथे सुरु असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीच्या शेवटच्या पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष रिकर्व्ह तिरंदाजी संघाने 24 संघांच्या एलिमनेशन फेरीत टॉप सिडींग घेत प्रवेश केला आहे.

Advertisement

तरुणदीप राय, धीरज भोमदेवरा आणि प्रवीण जाधव यांचा समावेश असलेल्या भारतीय रिकर्व्ह तिरंदाजी संघाने एकूण 2018 गुण नोंदवित पोल पोझिशन पटकाविले. चीन तैपेईने 2008 गुणासह दुसरे तर जर्मनीने 1998 गुणासह तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत एकूण 46 संघांचा समावेश आहे. एलिमनेशन फेरीत 24 संघ आहेत. भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने टॉप सिडींग मिळविल्याने त्यांना शेवटच्या 16 संघात स्थान मिळविण्यासाठी पुढे चाल मिळाली. आता भारताचा पुढील सामना लक्झमबर्गशी होणार आहे. एलिमनेशन फेरीत पहिले तीन मानांकनातील संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा पद्धतीनुसार पात्र ठरतील.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article