भारतामध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 1.28 कोटींनी घटली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतामध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या डिसेंबर 2021 च्या दरम्यान महिन्याच्या आधारे 1.28 कोटी ग्राहकांच्या संख्येत घसरण झाली आहे, अशी माहिती दूरसंचार नियामक ट्राय यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत सांगितली आहे. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचे ग्राहक कमी झाले आहेत. दुसऱया बाजूला भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्या मात्र वेगाने वाढ होत गेली आहे.
यामध्ये रिलायन्स जिओने जवळपास 1.29 कोटी वायरलेस ग्राहकांना गमवले असून त्यांच्या ग्राहकांची संख्या 41.57 कोटींनी घटली आहे. दुसऱया कंपनीत व्होडाफोन आयडिया यांनी डिसेंबर 2021 मध्ये 16.14 लाख मोबाईल ग्राहकांनी कंपनी सोडली असून त्यांची ग्राहक संख्या 26.55 कोटी ग्राहक इतकी राहिली आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एअरटेल कंपनीजवळ 4.75 लाख ग्राहक वधारले आहेत. तर वायरलेस ग्राहकांची संख्या वाढून 35.57 कोटींच्या घरात राहिली आहे.