For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे पुरुष, महिला टेटे संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

06:35 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे पुरुष  महिला टेटे संघ ऑलिम्पिकसाठी पात्र
Advertisement

मानांकनाच्या आधारावर मिळाले ऑलिम्पिक तिकीट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवित नवा इतिहास घडविला. जागतिक मानांकनाच्या आधारावर त्यांना प्रथमच ऑलिम्पिक पात्रता मिळाली आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या वर्ल्ड टीम टेटे चॅम्पियनशिपनंतर ऑलिम्पिकसाठी सात जागा बाकी राहिल्या होत्या. त्या आता संघांच्या जागतिक मानांकनाच्या आधारावर भरण्यात आल्या आहेत. ‘वरचे मानांकन असलेले जे संघ अद्याप पात्र ठरले नव्हते, त्यांनी आता पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे,’ असे आयटीटीएफने सांगितले.

महिला विभागात भारतीय महिलांना 13 वे मानांकन असून पोलंड (12), स्ष्वीडन (15) व थायलंड या संघांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले तर क्रोएशिया (12), भारत (15), स्लोव्हेनिया (11) यांच्या पुरुष संघांचेही ऑलिम्पिक स्थान निश्चित झाले आहे. ‘भारताने अखेर सांघिक विभागात ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. खूप कालावधीपासून आम्ही याची प्रतीक्षा करीत होतो. ऑलिम्पिकमध्ये मी पाचव्यांदा खेळणार असलो तरी हे फारच स्पेशल आहे. आमच्या महिला संघाचेही अभिनंदन, तेही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत,’ असे अनुभवी शरथ कमलने सोशल मीडियार म्हटले आहे.

ऑलिम्पिकमध्ये सांघिक विभागात खेळण्याची 2008 नंतरची ही पहिलीच वेळ आहे. अलीकडेच झालेल्या वर्ल्ड टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र पात्रता मिळविण्यात ते अपयशी ठरले होते. मानांकनाच्या आघारे मात्र त्यांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.