महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची मालिकेत विजयी आघाडी

06:58 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अफगाणचा सलग दुसरा पराभव : जैस्वाल, शिवम दुबे यांची अर्धशतके, सामनावीर अक्षरचे 2 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisement

येथील होळकर स्टेडियमवरील दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर यजमान भारताने अफगाणचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. भारतीय संघ आता या मालिकेत अफगाणचा व्हाईट वॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवम दुबेने अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले. त्याने फलंदाजीत 32 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 63 तर जैस्वालने 34 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 68 धावा झोडपल्या. 17 धावांत 2 बळी टिपणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीराचा बहुमान मिळाला.

अफगाणकडून भारताला विजयासाठी 173 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर फारुकीने कर्णधार रोहित शर्माचा त्रिफळा उडविला. सलग दुसऱ्या सामन्यात शर्माला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. भारताने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 69 धावा जमविताना 2 गडी गमविले. 6 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नवीन उल हकने कोहलीला झद्रनकरवी झेलबाद केले. कोहलीने 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा जमविल्या. भारताचे अर्धशतक 28 चेंडूत फलकावर लागले. जैस्वालने केवळ 27 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकवले. भारताचे शतक 56 चेंडूत नोंदविले गेले. जैस्वालला शिवम दुबेकडून चांगली साथ मिळाली. दुबे आणि जैस्वाल यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 25 चेंडूत पूर्ण केली. दरम्यान शिवम दुबेने 22 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक नोंदविले. 13 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर करिम जनतने जैस्वालला झेलबाद केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला जितेश शर्मा करीम जनतच्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी नबीकरवी झेलबाद झाला. 13 व्या षटकाअखेर भारताने 4 बाद 156 धावा जमविल्या होत्या. भारताचे दीडशतक 73 चेंडूत फलकावर लागले. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दुबेने नाबाद 63 तर रिंकू सिंगने 9 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. अफगाणतर्फे करिम जनतने 2 तर फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावात 10 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले.

नईबचे अर्धशतक

तत्पुर्वी गुलाबदिन नईबच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारताविरुद्ध 20 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी 173 धावा करायच्या आहेत. अफगाणकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. याशिवाय नजीबुल्लाह, करीम जनत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांच्या जागी स्थान देण्यात आले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना अफगाण संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रेहमानुल्लाह गुरबाजला 14 धावांवर रवि बिष्णोईने बाद केले. यानंतर कर्णधार इब्राहिम झद्रन (8) व अजमतउल्लाह उमरझाई (2) यांनी निराशा केली. मात्र, अनुभवी गुलबदिन नईबने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना 35 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 57 धावांची शानदार खेळी साकारली. आक्रमक खेळणाऱ्या नईबचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. यानंतर मोहम्मद नबी 18 चेंडूत 14 तर मुजीब उर रहमानने 9 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 21 आणि करीम जनतने 10 चेंडूत 20 धावा फटकावल्या. 19 षटकांत अफगाण संघाने 6 बाद 164 धावा केल्या होत्या. यानंतर शेवटच्या षटकात अफगाण संघाने चार विकेट गमावल्या. यामध्ये अर्शदीपने दोन विकेट्स घेतल्या तर दोन फलंदाज शेवटच्या दोन चेंडूत धावबाद झाले. यामुळे अफगाणिस्तानचा डाव 20 षटकात 172 धावात संपुष्टात आला.

भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. शिवम दुबेने एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 20 षटकांत सर्वबाद 172 (रेहमानउल्लाह गुरबाज 14, इब्राहिम झद्रन 8, गुलबदिन नईब 57, मोहम्मद नबी 14, नजीबउल्लाह 23, करीम जनत 20, मुजीब रहमान 21, अर्शदीप सिंग 30 धावांत 3 बळी, रवि बिश्नोई व अक्षर पटेल प्रत्येकी दोन बळी, शिवम दुबे एक बळी), भारत 15.4 षटकात 4 बाद 173 (जैस्वाल 34 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांसह 68, रोहित शर्मा 0, कोहली 16 चेंडूत 5 चौकारांसह 29, शिवम दुबे 32 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 63, जितेश शर्मा 0, रिंकू सिंग 1 चौकारासह नाबाद 9, अवांतर 4, करीम जनत 2-13, फारुकी 1-28, नवीन उल हक 1-33).

रोहित शर्माचे ‘दीडशतक’

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अफगाणविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरताच एक खास विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, रोहित शर्मा 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही क्रिकेटपटूने असा पराक्रम केला नाही. या यादीत आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे खेळाडू

  1. रोहित शर्मा (भारत) - 150 सामने
  2. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) - 134 सामने
  3. जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) - 128 सामने
  4. शोएब मलिक (पाकिस्तान) - 124 सामने
  5. मार्टिन गप्टील (न्यूझीलंड) - 122 सामने
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article