महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची पाम तेल आयात घटली

12:32 AM Jan 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :

Advertisement

भारताची पाम तेल आयात डिसेंबर 2019 मध्ये 8.64 टक्क्यांनी घटून 7,41,490 टनावर राहिली आहे. भारताकडून डिसेंबर 2018 मध्ये 8,11, 700 टन इतकी पाम तेलाची आयात करण्यात आल्याची माहिती उद्योग संघटना सॉल्वंट एक्सटॅक्टर्स असोसिएशन (एसईए) यांच्याकडून देण्यात आली आहे.

Advertisement

देशातील एकूण वनस्पती तेल आयातीत डिसेंबर 2019 मध्ये घटून 11.28 लाख टनावर राहिली आहे. डिसेंबर 2018 मध्ये हा आकडा 12.11 लाख टन राहिल्याची नोंद केली होती.

वनस्पती तेल आयातीचा हिस्सा 

देशातील एकूण वनस्पती तेलाच्या आयातीमध्ये पाम तेलाची हिस्सेदारी 60 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे पाम तेल उत्पादनामधील कच्चे पाम तेल (सीपीओ) आयात डिसेंबर 2019 मध्ये घटून 6,31, 824 टनावर राहिली आहे. जी एक वर्षापूर्वी 6,70,244 टन होती.

आरबीडी पामोलिनची आयातही घटली असून त्याचा आकडा 94,816 टनाच्या घरात पोहोचला आहे. की जो या अगोदर 1,30,459 टन राहिला होता. कच्चे पाम कर्नेल तेलाची (सीपीकेओ) आयात यांच्या अगोदर 10,977 टनांनी वाढून 14,850 टन झाली असल्याची माहिती एसईएने दिली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharatnews
Next Article