महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा वृद्धीदर 9.5 टक्क्यांवर राहणार

07:00 AM Feb 25, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : वर्ष 2022साठी भारताचा आर्थिक वृद्धीदर हा 9.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज मूडीज इंवेस्टर्सने नोंदवला आहे. तसेच एक एप्रिलपासून सुरु होणाऱया आगामी आर्थिक वर्षासाठी हा दर 8.4 टक्के केला आहे. सोबतच रेटिंग एजन्सीने तेलाच्या वाढत्या किमती व अन्य अडथळे हे वृद्धीला बाधक ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मूडिजने दिलेल्या माहितीनुसार आम्ही भारताच्या वृद्धीदराचा पूर्व अंदाज वर्ष 2022साठी सात टक्क्यांऐवजी 9.5 टक्के केला आहे. तर 2023 मध्ये 5.5 टक्के इतका वृद्धीदर राहणार असल्याची नोंद केली होती. मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये मूडीजने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी 7.96 टक्के दर राहणार असल्याचा अंदाज नेंदवला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article