महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप नेत्याच्या घरावर ‘तोयबा’चा हल्ला

06:30 AM Apr 02, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीनगरमधील घटना : संशयित हल्लेखोरांची ओळख पटली

Advertisement

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisement

श्रीनगरमधील नौगाम परिसरामध्ये गुरुवारी भाजप नेते अन्वर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तेथे तैनात असलेला एक सुरक्षा रक्षक ठार झाला आहे. सदर हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सहभाग उघड झाल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजयकुमार यांनी दिली. बुरखा परिधान करून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांची ओळख पटली असून दोघे श्रीनगर शहरातीलच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नौगाम येथे अन्वर यांच्या निवासावर गुरुवारी सकाळी हल्ला करण्यात आला. अन्वर हे बारामुल्लाचे जिल्हा सरचिटणीस तसेच कुपवाडा विभागाचे प्रभारी आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात राजकीय नेत्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी सोमवारी सोपोरमध्ये नगरपरिषद कार्यालयावर हल्ला करत राजकीय नेत्यांना लक्ष्य बनविण्यात आले होते. यावेळी गोळीबारात नगरसेवक रियाझ अहमद आणि शम्सुद्दीन यांचा मृत्यू झाला होता. तसेच एका सुरक्षा रक्षकालाही प्राण गमवावे लागले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article