भाजप अध्यक्षांकडून दोन नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर
07:00 AM Jun 27, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी दोन राज्यांसाठी नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर केले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे. मणिपूर भाजप अध्यक्षपदी शारदा देवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आसाममध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आला आहे. तर मणिपूरमध्ये मागील महिन्यात प्रदेशाध्यक्षाचे निधन झाल्याने पद रिक्त होते. भाबेश कलिता हे आसाम भाजपचे नवे अध्यक्ष असणार आहेत. रंगिया मतदारसंघाचे आमदार भाबेश कलिता यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. भाबेश हे रंजीत कुमार दास यांची जागा घेणार आहेत. अलिकडेच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत राज्याची सत्ता राखली आहे. रंजीत कुमार दास यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने ही निवडणूक लढविली होती.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article