महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ब्रिटिश कंपनीकडून भारतात 4 हजार चार्जिंग स्टेशन?

08:26 PM Jan 20, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशभरात मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित : 2 हजार जणांना रोजगाराची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ब्रिटनची इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेवा पुरविणारी कंपनी ‘ईओ चार्जिंग’ पुढील तीन वर्षात भारतामध्ये 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन निर्माण करणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पहिल्या निशुल्क चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनाच्यावेळी  ईओ चार्जिंगची भारतातील एकमेव वितरण कंपनी याहवी इंटरप्रायजेसचे सीईओ संदीप यादव यांनी याबाबतची माहिती दिली.

गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतातील सादरीकरणानंतर कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. मार्च 2022 पर्यंत गुजरातमध्ये 300 पेक्षा अधिक स्टेशन असतील. तर यात 40 स्टेशन एकटय़ा अहमदाबादमध्ये असणार आहेत. कंपनीने डिसेंबरपासून रितसर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे काम हाती घेतले असून, आत्तापर्यंत देशभरात 20 स्टेशन सुरू केली आहेत. कंपनी घरगुती, मध्यम आणि मोठय़ा अशा तिन्ही प्रकारच्या चार्जिंग पॉईंटसाठी उपकरणे आणि सेवा पुरविते. बॅटरीवर चालणाऱया वाहनांसाठी आणि कंपनीच्या सेवेच्या प्रसारासाठी सुरुवातीला सर्व चार्जिंग स्टेशन निशुल्क असणार आहेत.

अडीच लाख लोकांना प्रशिक्षण

विद्यार्थी, संस्था, कंपनी कर्मचारी आणि बेरोजगार तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम कंपनीकडून सुरू आहे. मार्चपर्यंत अशा एक हजारपेक्षा अधिक कार्यक्रमांद्वारे अडीच लाख लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी काम सुरू आहे. कंपनी सुमारे 2 हजार लोकांना प्रत्यक्षरित्या रोजगारही उपलब्ध करणार आहे, असेही यादव यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# 4#British company?#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia000 charging stations
Next Article