महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनाने निधन

03:01 PM Apr 30, 2021 IST | Tousif Mujawar
Advertisement

ऑनलाईन टीम / मुंबई :

Advertisement

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. या उद्रेकात अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचाही कोरोनाने बळी घेतला आहे.

Advertisement

जगदीश लाड हे केवळ 34 वर्षांचे होते. जगदीश यांनी बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब मिळविला होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने ते बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचे निधन झाले आहे.

स्पर्धेसाठी जगदीश उभा राहिली की पदक निश्चित असायचे कारण त्याचे पिळदार शरीर हे सर्वांना आकर्षित करायचे. त्यासाठी जगदीश अपार मेहनतही करायचा. रोज सकाळी उठून दोन तास व्यायम, प्रोटीन्ससाठी चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण रोजच्या रोज जगदीशच्या आहारात असायचा.

जगदीश लाड यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. इतकेच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तर मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते.त्याच्या निधनावर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article