बेस्ट अपघाततील मृत्तांचा आकडा सातवर
तीन दिवसांचे प्रशिक्षण आणि हातात थेट इलेक्ट्रिक बसचे स्टेरींग : जखमींची संख्या 49 वर
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईमधील कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यावेळी तीन जणांचा मृत्यू व 20 जखमी होते. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत या संख्येत वाढ होत मृतांची संख्या सात वर तर 49 जण जखमी झाले आहेत. यातील काही जखमी गंभीर असून यातून मफतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघातप्रकरणी चालक संजय मोरे (वय 54) याला पोलिसांनी अटक केली आहे. चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे हा असल्फा येथे राहणारा असून त्याला इलेक्ट्रिक बस सारखी आधुनिक आणि अवजड वाहने चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याने यापूर्वी बेस्टमध्ये एमपी आणि हंसा कंपनीकडे चालक म्हणून काम केले आहे. हंसा कंपनी बंद झाल्यानंतर तो गेल्या ऑक्टोबर महिन्यात इव्ही ट्रान्सपोर्ट कंपनीत ऊजू झाला. मात्र यापूर्वी तो सध्या मिनीबस चालवत होता.
केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण
ईव्ही कंपनीत ऊजू झाल्यानंतर तो साधी मिनीबस चालवत होता. मात्र अचानक त्याची नेमणूक मोठी आधुनिक इलेक्ट्रिक बस गाडी चालवण्यासाठी देण्यात आली. यासाठी केवळ त्याला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे कंत्राटदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बस मध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही
अपघातग्रस्त बस ही खासगी कंत्राटदाराकडून चालवण्यात येत होती. इलेक्ट्रिक बस नवीन होती. त्यात कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता. शिवाय बसचा ब्रेक नादुऊस्त झाल्याचे वफत्त ही खोटे आहे. बस चालक संजय मोरे याला दारूचे व्यसन नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. बस चालकाकडून बस अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याचे बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बेस्ट प्रशासनाला भेटण्यास मज्जाव :
अपघात झालेल्या ठिकाणी तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले बस चे चालक आणि वाहक या दोघांना भेटण्यास बेस्ट प्रशासनाला मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे नेमकी माहिती घेणे बेस्ट प्रशासनाला कठीण झाले आहे.यामुळे अपघात कसा झाला याचे खरे कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताची माहिती गोळा करण्यासाठी पोलीस आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत.
चालकावर गुन्हा दाखल :
बीएनएस कलम 105, 110, 118 118(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने फेटाळून लावला आहे. मग हा अपघात कसा झाला याचे खरे कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताची माहिती गोळा करण्यासाठी पोलीस आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत.
वारसांना 5 लाखांची मदत :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेत मृत कुटुंबियांच्या दु?खात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मृतकांच्या वारसांना बेस्टकडून 2 लाखांची नुकसान भरपाई :
मफतांच्या कुटुंबीयांना बेस्ट प्रशासन 2 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींचा वैद्यकीय खर्च बेस्ट आणि महानगरपालिका प्रशासन करणार आहे.
सीसीटिव्ही तपासून अपघाताची कारणे शोधणार
अपघातग्रस्त बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी बसमधील सीसीटिव्ही शोधण्यात येणार आहे. अपघाताच्या पूर्वी बसमध्ये नेमकी काय स्थिती होती, कुणाचे भांडण झाले होते का, चालकाला विचलित करण्याचा प्रयत्न कुणी केला होता का, गाडीचा वेग किती होता अशा प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत.
जेव्हा गोण्यांचे स्ट्रेचर होतात...
सुसाट निघालेली बेस्ट बस... रस्त्याच्या बाजुला उभ्या असणाऱ्या रिक्षा बाईक गाड्यांना बेमुवर्तपणे उडवत.... परिसरात किंकाळ्या आणि मदतीचे टाहो... बसने उडवलेले जखमी आपल्याच अवयवांना निहाळत निपचित पडलेले.... हे दृश्य होते कुर्ला पश्चिमेकडील रस्त्यावरील. कोणाला काहीच सुचत नव्हते. जखमींना कशी मदत करावी याचे उत्तर सुचत नसताना रुग्णालयात दाखल करण्यासाठी बाजुच्या मंडईतून, दुकानांमधील आणि सोसायट्यांमधून गोण्या काढण्यात आल्या. त्यावर कसे बसे जखमींना घेत रुग्णांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. जखमींचा सगळा रोख भाभा रुग्णालयाकडेच होता.
आ. ज्योती गायकवाड व अमीन पटेल यांच्याकडून जखमींना मदत निधीची मागणी :
मंगळवारी भाभा रुग्णालयांना नेते आणि मंत्र्यांच्या भेटी सुरु झाल्या. यात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड तसेच अमीन पटेल नेते उपस्थित होते. यावेळी नगरसेवकच नसल्याने नागरी पातळीवरील प्राथमिक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे गायकवाड म्हणाल्या. नगरसेवक नसल्याने प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत. यात मनपा स्पीड ब्रेकर, किंवा वाढलेले फेरिवाले यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मृतांना मदत केल्याचे चांगले असल्याचे सांगत मात्र जखमींना देखील मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर मनपा ऊग्णालयांत मोफत उपचार होत असल्याची माहिती देखील यावेळी करण्यात आली.