महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बॅड न्यूज’मध्ये दिसणार अनन्या

06:13 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विक्की कौशल-तृप्ति डिमरी मुख्य भूमिकेत

Advertisement

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या स्वत:चे खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावरुन चर्चेत आहे. अनन्या लवकरच ‘कॉल मी बे’द्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. याचदरम्यान आनंद तिवारींकडून दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्मित आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’मध्येही ती भूमिका साकारणार आहे.

Advertisement

बॅड न्यूज या चित्रपटात ती एका रोमांचक कॅमियो भूमिकेसाठी तयारी करत आहे. विक्की कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात अनन्या पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अनन्याच्या भूमिकेचे चित्रिकरण सुरू करण्यात आले आहे.

अनन्या यापूर्वी आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात दिसून आली होती. अनन्या अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियरसाठी सज्ज आगामी सीरिज ‘कॉल मी बे’मधील मुख्य भूमिकेसह ओटीटीच्या जगतात पदार्पण करणार आहे. कॉल मी बेच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article