महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘बीजीडीसी’मध्ये पूजा भट्ट

06:36 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

14 मार्चला प्राइम व्हिडिओवर होणार प्रदर्शित

Advertisement

रियलिटी शो ‘बिग बॉस 16’नंतर बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट आता वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजचे नाव ‘बीजीडीसी’ आहे. यात शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची कहाणी दाखविली जाणार आहे. या मुलींची स्वत:ची स्वप्ने, आकांक्षा असल्याचे दाखविले जाणार आहे.

Advertisement

शाळा-महाविद्यालयात मुली केवळ शिकतात असे नाही तर एक वेगळ्या प्रकारचे जीवनही जगतात, हेच जीवन त्यांना आयुष्यभर आठवत राहते. वयाच्या या टप्प्यात कुणाकडून काही चुका होत असल्याचे या सीरिजमध्ये दर्शविण्यात आले आहे.

या सीरिजमध्ये पूजा भट्टसोबत जोया हुसैन, लवलीन मिश्रा, मुकुल च•ा, रायमा सेन, दलाई तेनजिन लक्यिला, अवंतिका वंदनपु, अनीत प•ा, अक्षिता सूद, अफरा सैयद, विदुषी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

नित्या मेहरा, करण कपाडिया, कोपल नैथान आणि सुधांशु सरिया यांनी याचे दिग्दर्शन पेले आहे. तर सुधांशु सरिया, अदवितिया करेंग दास, सुनयना कुमारी आणि राधिका मल्होत्रा यांनी कहाणी लिहिली आहे. ही सीरज प्राइम व्हिडिओवर 14 मार्चपासून पाहता येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article