बीएसएनएल-एमटीएनएल कंपन्या बंद नाही होणार
08:55 PM Feb 07, 2020 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
केंद्र सरकारची नुकतीच एक बैठक झाली आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या एमटीएनएल आणि बीएसएनएल यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नवीन योजना आखणार असल्याचा विश्वास व्यक्त करत या कंपन्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार असून त्या कधीही बंद होऊ देणार नसल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितले आहे.
सरकार निधी उपलब्ध करुन देणार
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उतर देताना आम्ही बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्या बंद होऊ देणार नाही. तर यांच्या बळकटीसाठी सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
Advertisement
Next Article